Home भंडारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राष्ट्रकवी संजय निकम यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राष्ट्रकवी संजय निकम यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश

44
0

आशाताई बच्छाव

1000818207.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राष्ट्रकवी संजय निकम यांनी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश

 

मालेगाव (संजीव भांबोरे )येथील सुप्रसिध्द राष्ट्रकवी, लेखक व समीक्षक संजय मुकूंदराव निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई येथे औपचारिक भेट घेतली. त्या भेटीत राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम ह्यांनी ‘मेरा भारत’ हा हिंदी काव्यसंग्रह मोदी ह्यांना सप्रेम भेट दिला. त्यावेळी राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम ह्यांनी महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे. तरी आपण वैयक्तिक लक्ष घालून महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावी अशी विनंती केली.
मराठी भाषा यासाठीचे सारे निकष पुर्ण करते. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा या मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आणि पंतप्रधान मोदींनीही होकार दिला. त्याप्रमाणे महाराष्ट्र राजभाषा माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही घोषणा दि. ३/१०/२०२४ रोजी केंद्र सरकारने केली आणि मराठी राजभाषा अभिजात दर्जाची भाषा म्हणून सन्मानीत झाली.
राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम ह्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. त्यामुळे देशभरातून आणि महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण मायमराठी’ हा काव्यसंग्रह ही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिला. मोदींनी त्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि मेरा भारत साठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleया पित्याच्या चुकीला देशाची माफी नाही! -काय केले या क्रूर पित्याने ?
Next articleगोखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला पाचव्या दिवशी राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे यांची भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here