आशाताई बच्छाव
परळीतील जीवघेण्या राखेच्या प्रदूषणापासून परळीकरांची सुटका कधी होणार – अँड.मनोज संकाये
पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी वैजनाथ दि: ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ व ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळी वैजनाथ हे सध्या राखेच्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यापासून सामान्य नागरिक जेरीस आला असून त्याची सुटका कधी होणार असा सवाल करत जाणून बुजून पोलीस आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केला आहे.
परळी वैजनाथ येथे थर्मल पावर स्टेशन आहे. कोळशाचा वापर करून औष्णिक वीज निर्मिती शहरात होते. शहरातील वीज निर्मिती होत असताना उरलेली राख ही विकल्या जाते. राखीचे मोठे मोठे टँकर्स वाहतूक करत आहे मात्र वाहतूक करताना रस्त्यांवर राखेचे ढिगारे पडलेले आहेत. त्या ढिगार्यामधील राख हवेमध्ये मिसळून त्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरून ही वाहने राखेची वाहतूक करतात शहरात सगळीकडे राखच राख दिसत आहे. ताडपत्रीने राख झाकली जात नाही ती सर्रास रस्त्यावर हवेमुळे उडते. वाहने राखेची वाहतूक उघडपणाने करत आहेत. हे वाहन धारक अति वेगाने वाहन रस्त्याने चालवत असताना गतिरोधक वर आदळल्याने राखीचे ढिगारे रस्त्यावर पडत आहेत यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यामध्ये वाढ होत आहे. वाहनांना शिस्त लावणाऱ्या यंत्रणा मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवायला तयार नाही ही मोठी शोकांतिका आहे.