Home भंडारा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सुरू

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सुरू

117
0

आशाताई बच्छाव

1000808998.jpg

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सुरू

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी घेतली भेट

उपोषण मंडपाला पोलीस सुरक्षा नाही

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )आज दिनांक ३ आक्टोंबर 2024 ला रोज गुरुवार ला सकाळी 9 वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण मंडपाला जिल्हाधिकारी कार्यालय समोर भंडारा येथे भेट देऊन तेथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मागील पंचवीस वर्षांपासून त्या समस्याकडे शासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत. या प्रकल्पग्रस्तात बऱ्याच लोकांच्या जमिनी गेल्या, मकान गेले ,त्यांना शासनाने अल्प मोबदला देऊन त्यांना मोकळे केले. आज शासनाने त्यांना नोकरी सुद्धा दिलेले नाही. जे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत त्यांना जमीन सुद्धा देण्यात आलेली नाही . वाढीव कुटुंबाचा 2.90 लाख मोबदला सुद्धा देण्यात आलेला नाही. जे प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरी लागले होते त्यांना सुद्धा नोकरी काढण्यात आले. त्या उमेदवारांमध्ये मयुरी सुखदेवे, शिल्पा सुखदेवे, नितीन उईके, स्नेहा नागदेवे, भारती तांडेकर, प्रवीण धोटे,अशोक मारबते ,मंगेश धानेरे, सौरभ माटे ,दीपक भेदे ,कार्तिक भुते अमरदीप धनविजय ,कृष्णा बागडे, यांचा समावेश आहे. सदर जीआर हा 2015 ला निघाला होता .परंतु हा लागू 2024 लागू करण्यात आला. त्याचा फटका वरील प्रकल्पग्रस्त नोकरी लागलेल्या उमेदवारावर बसला हे शासनाची दडपशाही आहे. जे आमदार ,खासदार कोणताही संघर्ष न करता ज्या मतदारांनी त्यांना पाच वर्षाकरिता सेवेकरता निवडून दिले त्यांनी आपल्याकरता सर्व सोयीसुविधात लागून घेतल्या .परंतु जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या जमिनी गेल्या ,घरे गेले , ते आज नोकरीसाठी वणवण भटकत आहेत. त्यांनाच शासन न्यायापासून वंचित ठेवत आहे. ही लोकशाही की ठोकशाही? प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 2.90 लक्ष रुपयाचा लाभ घेतलेल्या प्रकल्प बाधितांचे नोकरी विषयी प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यात यावे ,वाढीव कुटुंब 2. 90 लक्ष रुपये वाढीव कुटुंबातील पात्र व्यक्तीला तसेच बाधित प्रकल्पग्रस्त देण्यात यांना यावे ,तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरांमुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. 75 टक्के शेतजमीन गेलेली आहे अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे ,प्रकल्प बाधित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यात यावे ,त्याचप्रमाणे भंडारा तालुक्यातील निमगाव गाव 75 टक्के हा गोसे खुर्द च्या बॅक वॉटर मुळे फटका बसतो त्या गावची 75 टक्के जमीन गोसेखुर्द धरणात गेलेली आहे. त्यामुळे त्या गावाचे सुद्धा पुनर्वसन करण्यात येऊन त्यांना गावठाण ची व्यवस्था करण्यात यावी. आमरण उपोषणाला गोसे खुर्दप्रकल्पग्रस्त समितीचे शासकीय समिती सदस्य भाऊ कातोरे ,दिलीप मडामे माझी सरपंच खमारी, सुनील भोपे तंटामुक्त अध्यक्ष टाकळी हे आमरण उपोषणाला बसले आहेत. शासनाने तात्काळ जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन आमरण उपोषण सोडवावे व गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा अशी मागणी सुद्धा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

Previous articleविकासपुरुष सामान्यांचा ‘आवाज’
Next articleसंविधान चौक नागपूर येथे रिपब्लिकन एकता स्थापना दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे या मागणी करिता विशाल धरणा आंदोलन कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here