Home भंडारा वृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त –अमृत बन्सोड...

वृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त –अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन

30
0

आशाताई बच्छाव

1000804190.jpg

वृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त –अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन

सीनिअर सिटीजन मल्टीपरपज असोसिएशनचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी ) आज घडीला देशात १० कोटी वृद्ध आहेत .पुढे २०५० पर्यंत ते 32 कोटीच्या घरात पोहोचतील. त्यावर आत्ताच विचार व्हायला पाहिजेत . वृद्धत्व सुखकारक होण्यासाठी तरुणांनी त्यांच्या साठीनंतरचे आर्थिक, शारीरिक ,कौटुंबिक , सामाजिक नियोजन करावे तरच त्यांचे वार्धक्य सुखाचे होईल. परंतु सुखाने जीवन जगण्याची इच्छा असूनही कौटुंबिक व इतर जबाबदारीमुळे मुलाबाळा व कुटुंबाच्या सुखासाठी आतापर्यंत जगणाऱ्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात नेणे हे लाजिरवाणे आहे. हा मातृत्वाचा अपमान व पितृत्वावर मोठा प्रहार आहे. वृद्ध आई-वडील म्हणजे ओझे अशी अलीकडे भावना निर्माण झाली आहे .परंतु वृद्धांना ओझे न समजता त्यांच्या मुलाबाळांनी कर्तव्य म्हणून त्यांना सांभाळले पाहिजे.” असे विचार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांनी व्यक्त केले. जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सीनिअर सिटीजन मल्टीपरपज असोसिएशन द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह नाशिकनगर,भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माज नगराध्यक्ष महेंद्र गडकरी होते.
याप्रसंगी महादेव मेश्राम ,एम डब्ल्यू .दहिवले ,इंजिं. रामटेके यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले. महेंद्र गडकरी म्हणाले की ज्येष्ठांनी सुद्धा काळानुरूप बदलून मुलांबळा सोबत समरस व्हावे. तरुणांनी वृद्धांच्या अनुभव व ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा. ‘हम तो हमारे दो’या चौकोनात न अडता वृद्धांनाही तिथे जागा द्यावी.
कार्यक्रमाचे संचालन सीनिअर संघटनेचे सचिव गुलशन गजभिये यांनी केले तर आभार करण रामटेके यांनी मानले कार्यक्रमासाठी लता करवाडे,चिंतामण बोरकर ,मुनींद्र सत देवे, आहूजा डोंगरे यांनी सहकार्य केले. शेवटी ज्येष्ठांनी जेष्ठांचे सामूहिक स्वागत केले.

Previous articleसोनई महाविद्यालय अंतर्गत स्वच्छता उपक्रम संपन्न…
Next articleगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here