Home नांदेड शौर्य दिनानिमित्तजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यक्रम साजरा

शौर्य दिनानिमित्तजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यक्रम साजरा

21
0

आशाताई बच्छाव

1000804132.jpg

शौर्य दिनानिमित्तजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यक्रम साजरा
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 1 ऑक्टोबर : शौर्य दिवस 29 सप्टेंबर हा दिवस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधुन प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विरनारी, वीरपिता, विरमाता व माजी सैनिकांचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याणअधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यातआला.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे आयेजित याकार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक मध्ये ऑ. कॅप्टन विठ्ठल कदम (निवृत्त), कल्याण संघटक नांदेड यांनी शौर्यदिनाचे महत्त्व सांगत भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे उग्रवादी कॅम्पस उद्धवस्त केले वअतिरेक्याचा खात्मा केला होता. ही कार्यवाही जम्मूकश्मीर उरी येथे झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्ल्याचा बदलाघेण्यासाठी करण्यात आली होती. या दिनानिमित्त सर्व माजी सैनिकांना निवासी उपजिल्हाधिकारीतथा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकरयांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सैनिकांचे जीवनखडतर असल्याचे सांगितले. माजी सैनिकांच्याअडीअडचणी सोडविण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले.

सार्जेंट रामरावथडके (निवृत्त), ऑ प्रकाश कॅप्टन कस्तुरे (निवृत्त), सुभेदार अर्जुन जाधव (निवृत्त), वसतिगृह अधीक्षक नांदेड,सुभेदार बालाजी भोरगे तसेच विविध ऑपरेशनमध्ये सहभागी झालेलेमाजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील डूमने, संजय जाधव,प्रकाश कस्तुरे, अनिल देवज्ञे, सुर्यकांत कदम यांनी परिश्रम घेतले.

Previous articleमाझी वसुंधरा सर्वेक्षणात कोकण विभागात अलिबाग नगर परिषदला तृतीय क्रमांक; 50 लाखाचे बक्षीस जाहीर
Next articleज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तर मग कायदा आपले कर्तव्य बजावेल – दलजित कौर जज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here