Home भंडारा महाराष्ट्राचे राज्यपाल सी .पी .राधाकृष्णन यांना गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निवेदन

महाराष्ट्राचे राज्यपाल सी .पी .राधाकृष्णन यांना गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निवेदन

50
0

आशाताई बच्छाव

1000801710.jpg

महाराष्ट्राचे राज्यपाल सी .पी .राधाकृष्णन यांना गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना गोसीखुर्द गावातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीचे अशासकीय सदस्य भाऊ कातोरे व प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे जिल्हा सचिव शेषराज रामटेके प्रमिला शहारे,यांनी राज्यपालांची भेट घेऊन गोसीखुर्द गावातील समस्या सोडविण्याकरिता चर्चा करून निवेदन देण्यात आले .देण्यात आलेल्या प्रमुख निवेदनामध्ये गोसे खुर्द प्रकल्पग्रस्त नोकरी करिता प्रमाणपत्र देण्यात आले ते 2022- 23 पासून रद्द करण्यात आले ते पूर्ववत करण्यात यावे, वाढीव कुटुंबाला 2.90 लक्ष रुपये ,प्रकल्पग्रस्त प्रकल्प बाधित व अंशतः बाधित यांना देण्यात यावे ,गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त भूमीहीनांना कमीत कमी एक एकर शेत जमीन देण्यात यावी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त बेरोजगार असल्याने त्यांना पोट भरण्याकरिता रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा ,तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरामुळे भरपूर नुकसान होत असल्यामुळे त्या गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे ,75% शेतजमीन गेलेले अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here