Home बुलढाणा कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.

कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.

19
0

आशाताई बच्छाव

1000801644.jpg

कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुका अंतर्गत जिल्ह्यातील परत एका शेतकऱ्याची आत्महत्या.सतत होणारी ना पिके व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मंगरूळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात दोरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की चिखली तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवाशी असलेली रामदास आनंदा गवते वय वर्षे ५५ यांच्याकडे मंगरूळ शिवारात गट नंबर.३६९ अडीच ते तीन एकर दरम्यान जमीन आहे. परंतु याच जमिनीवर त्यांनी जिल्हा बँकेकडून साठ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून सततची नापीकी होत असल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत होता. यावर्षी कपाशी व सोयाबिन ही दोन्ही पीके चांगले उत्पन्न देणार या आशेपोटी त्यांनी पिकावर बँककर्ज काढले होते. मात्र सोयाबीन पिकावर हुमनी अळी आणि पिवळसर रोगाने आक्रमण केले.यामुळे प्रचंड नुकसान झाल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्या समोर होता. या तनावातुन रात्रीच्या सुमारास घरातील सर्व सदस्य झोपेत असताना स्वतःच्या राहत्या घरातील गच्चीवरील कॉलमला त्यांनी गळफास घेवून स्वतःला संपविले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले व पवार यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. भगवान भिकाजी सुरूशे यांच्या जबाबावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे गवते कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here