Home गडचिरोली निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – विरोधी पक्षनेते विजय...

निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

35
0

आशाताई बच्छाव

1000778675.jpg

निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

ब्रह्मपुरी येथे आढावा बैठक – गुणवत्ता दर्जा तपासणीसाठी समिती नेमण्याचे निर्देश                 गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून आपण कोट्यावधींचा निधी खेचून आणला. सदर विकास कामांचे कंत्राट घेणारे कंत्राटदार यांनी बहुतांश ठिकाणी विहित कालावधीत कामे पुर्ण केली नसल्याने व बऱ्याच ठिकाणच्या कामाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने यावर अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत या संदर्भात विशेष समिती मार्फत विकास कामांची चौकशी करून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असे ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित अधिकारी व कंत्राटदारना ठणकावले.

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्राम खेड्यांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध व्हावे याकरिता पाणीपुरवठा योजनेची विकास कामे जोमात सुरू आहे. मात्र सदर कामांचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांकडून विहित कालावधीत जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्यात आली नाही. याची माहिती प्राप्त होताच राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज तात्काळ ब्रह्मपुरी येथे तीनही तालुक्यांच्या प्रमुख अधिकारी, नळ योजनेचे अभियंते व संबंधित ग्रामपंचायतीच ग्रामसेवक यांचा आढावा घेत निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या कंत्राटदारांना गुणवत्ता दर्जापूर्ण कामे करा . सोबतच नळ योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्वरत करा अन्यथा काळ्या यादीत टाकणार असे स्पष्ट ठणकावून सांगितले. सोबतच या विकास कामांची चाचपणी करण्यासाठी एक विशेष समिती नेमून कामाचा गुणवत्ता दर्जा तपासणार असेही ते यावेळी म्हणाले. यानंतर सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील वन जमिनीवरील अतिक्रमण व नागरिकांना जमिनीचे पट्टे या प्रलंबित प्रकरणावर विस्तृत चर्चा केली. याप्रसंगी प्रामुख्याने चिमुर उपविभागीय अधिकारी गाडगे, जि‌.प.पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता बोहरे, ब्रम्हपूरी तहसीलदार सतीश मासाळ, सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, सरपंच संघटनेने अध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे तसेच संबंधित विभागाचे सर्व अधिकारी शाखा अभियंता ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक उपस्थित होते.

Previous articleभोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिकांना मिळणार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ.
Next articleदेवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा मेळावा कुरुड व कुनघाडा येथे आज २५ सप्टेंबरला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here