Home पुणे इशप्रित कटारीयाने पटकावले सुवर्णपदक

इशप्रित कटारीयाने पटकावले सुवर्णपदक

24
0

आशाताई बच्छाव

1000778670.jpg

पुणे, ब्युरो चीफ उमेश पाटील –सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव या ठिकाणी आज आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत इशप्रित कटारिया या विद्यार्थिनी सुवर्णपदक पटकावल्या बद्दल व पुणे युथ कप फुटबॉल २०२४ या स्पर्धेत वयोगट १७ वर्षाखालील मुले या खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तृतीय चॅम्पियनशिप मिळवल्याबद्दल शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी सेक्रेटरी राजेश मनाकांत,मुख्याध्यापिका सीमा कांबळे,प्रायमरी मुख्याध्यापिका माया बायस,समन्वयक वैशाली दिंडाळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले पिंपळे गुरवचे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असे सामाजिक कार्यकर्ते आणि संजय गांधी निराधार योजना ( महाराष्ट्र शासन ) यांचे सदस्य संजय मराठे तसेच श्री.कृष्णा भांडाळकर ( सिनेट मेंबर एस पी यु ) प्रदीप रणदिवे बॉक्सिंग कोच,जितू कटारिया इत्यादी मान्यवरांच्या हस्ते या सर्व खेळाडूंचा भव्य असा सत्कार व त्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जे यश प्राप्त केले आहे त्या यशावरच न थांबता असेच आणखीन जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय आणि देश पातळीवर आपल्या शाळेचे नावमानाने घेतील असा खेळ करून आणखीन पारितोषिक जिंकावे आणि आपल्या शाळेचे नाव प्रसिद्ध करावे खेळाबरोबर शिक्षणालाही तेवढेच महत्त्व द्यावे.

Previous articleदैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न
Next articleभोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिकांना मिळणार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here