आशाताई बच्छाव
पोषण आहार माह कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतीसाद
पोषण आहार बाळासाठी अमृत आहे त्याचे सेवन व्यवस्थीत करा
प्लॅन इंडिया व आरोग्य वी़भागाचे मातांना आवाहण
गोपाल तिवारी
वाशीम जिल्ह्यातील मालेगांव येथिल प्लान इंडिया, जिल्हा परिषद वाशीम, आरोग्य विभाग आणि आय सी डी एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून पोषण ते ३० सप्टेम्बर पर्यन्त मालेगांव तालुक्यात पोषण आहार नियोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पोषण आहार हा मातासांठी व बाळांसाठी अमृत असून याचे योग्यनोजन करा असे आवाहण यावेळी प्लॅन इंडिया व आरोग्य. वी़भागाच्या वतीने करण्यात आले आहे
मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये पोषण, अतिसार व्यवस्थापन , न्यूमोनिया, अनिमिया तसेच माता आणि बाल आरोग्य या विषयांवर लाभार्थी व उपस्थित सहभागी यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ अश्विनी खासबागे तालुका वैद्यकीय अधिकारी मालेगाव , मदन नायक सी, डी, पी, ओ मालेगाव तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी आणि प्लान इंडिया च्या सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स किड्स अंडर ५ टीमचे दिनेश प्रजापती स्टेट मैनेजर महा, सुरज पवार प्रकल्प समन्वयक, भूषण कोल्हे तालुका अधिकारी सर्वांच्या सहकार्याने मार्गदर्शन करीत आहे. तसेच, सेल्फ केअर टीमच्या सी.एच.डब्ल्यू शुभा इंगळे, शीतल नागले, वैष्णवी नरवाडे, मोहिनी उईके, काजल राठोड ह्या कार्यक्षेत्रातील समस्त समुदाय वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, ए,एन,एम, आशा सेविका व अन्य सर्व आरोग्य कर्मचारी सह प्रभावीपणे कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित लाभार्थ्यांना पोषणाचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी, अतिसार व्यवस्थापन, गरोदरपणात घ्यावयाच्या काळजी आणि मुलांचे व मातांचे आरोग्य राखण्यासाठी आहाराचे महत्व यावर सखोल माहिती देण्यात येत असून सदर कार्यक्रम ३० सेप्ट २०२४ पर्यत चालणार आहे.