Home भंडारा कटकवार विद्यालयात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धेचे करण्यात आले...

कटकवार विद्यालयात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजन

80
0

आशाताई बच्छाव

1000759797.jpg

कटकवार विद्यालयात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण सेवा योजना तसेच राष्ट्रीय हरित सेना योजना अंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम इको फ्रेंडली गणेशोत्सव कसा साजरा करावा याची माहिती प्राचार्य विजय देवगिरकर व ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर इकोफ्रेंडली गणेशमूर्ती कशी तयार करावी याबद्दल मार्गदर्शन शिक्षिका पुष्पा बोरकर व अंजना रणदिवे, शिक्षक बी एस लंजे यांनी केले. त्यानंतर ग्लोबल नेचर क्लब सदस्यांनी स्वहस्ते तयार करून आणल्या. त्याचसोबत गणेश मूर्ती सभोवताल पर्यावरण देखावा करून त्यावर पर्यावरण संवर्धन संदेश लिहिले. सर्वांनी आईल पेंटचा वापर न करता साध्या जलरंगाने व साध्या मातीने सुबक मूर्ती तयार केल्या . या स्पर्धेत मिडलस्कुल गटात चाहत अरकासे हिला प्रथम तर हर्ष धकाते व ओवी इलमकर यांनां दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त झाला. मोहित लंजे याला प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला.
हायस्कुल गटात लक्ष्मी धकाते हिला प्रथम तर वैशाली मेश्राम हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
कटकवार विद्यालयात सुद्धा पाच दिवसीय पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यनिमित्ताने अनेक स्पर्धा, भजन -कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले .
इको फ्रेंडली गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनाकरिता नगरपरिषद साकोली तर्फे प्रशस्ती प्रमाणपत्र प्राचार्य विजय देवगिरकर सरांना देऊन त्यांना गौरवांकित करण्यात आले
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता जागेश्वर तिडके, के. पी. बिसेन,नीलिमा गेडाम,शीतल साहू तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here