Home बुलढाणा तर महसूल मंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करणार ! – शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष...

तर महसूल मंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करणार ! – शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर यांचा इशारा ! -महसूल यंत्रणेत खळबळ

24
0

आशाताई बच्छाव

1000757286.jpg

..तर महसूल मंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करणार ! – शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर यांचा इशारा ! -महसूल यंत्रणेत खळबळ
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा रेतीमाफिया विरुद्ध शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर यांनी अंदोलन असता, सिंदखेडचे उपविभागीय अधिकारी प्रा. डॉ. खडसे यांनी संयुक्त पथक पाठवून काल देऊळगाव राजा हद्दीत खडकपूर्णातील तीन बोटी नष्ट केल्या. त्यामुळे भुतेकर यांनी आपले आंदोलन तूर्तास तात्पुरते स्थगित केले असले तरी, ते सध्या मुंबईला आहेत. रेतीचे योग्य नियोजन करेपर्यंत मी गावाला येणार नसून, महसूल मंत्र्याच्या दालनात 19 सप्टेंबर नंतर आत्मदहन करण्याचा त्यांनी नव्याने इशारा दिल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
खडकपूर्णा प्रकल्प पोखरत असताना प्रशासकीय
यंत्रणा मात्र आपले ‘अर्थपूर्ण’ इप्सित साध्य करत असल्याचा आरोप होतोय. रेतीची तस्करी खुलेआम सुरू असून खडकपूर्णा प्रकल्पातील रेती बोटी द्वारे उपसण्यात येत आहे. शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख संतोष भुतेकर यांनी वारंवार याप्रकरणी तक्रारी केल्या होत्या, उपोषण सुद्धा केले होते. मुंबईत जाऊन महसूलमंत्र्याच्या दालनात आत्मदहन करण्याच्या इशाऱ्याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना व संबंधित यंत्रणेला दिली होती. दरम्यान सिंदखेडचे उपविभागीय अधिकारी प्रा. डॉ. खडसे यांनी सदर आंदोलनाची दखल घेतली. काल 16 सप्टेंबर रोजी मौजे सिनगाव जहांगीर येथील बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पातील
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पातील दोन फायबर बोटी व एक इंजन बोट जिलेटिनच्या साह्याने नष्ट करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिसअधिकारी, तहसीलदार देऊळगाव राजा, एपीआय अंढेरा पोलीस स्टेशन, व महसूलच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली आहे. संतोष भुतेकर यांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले असले तरी महसूल विभाग व पोलीस विभाग जोपर्यंत रेतीचे योग्य ते नियोजन करत नाही तोपर्यंत मी गावाकडे येणार नाही आणि 19 सप्टेंबर नंतर महसूल मंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करेल अशी माहिती त्यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here