Home विदर्भ हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा

हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा

27
0

आशाताई बच्छाव

1000753429.jpg

हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –हिंगोली जिल्ह्याचे शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देन्यातआला असल्याची माहिती समोर आली असून हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभेचे शिंदे गटाचे माजी खासदार आहेत मागील दोन वर्षांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे त्यांनी मागणी केली होती त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक हळद पिकवणारा हिंगोली जिल्हा म्हणून नवा रुपाला आल्यानंतर या ठिकाणी हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळद संशोधन केंद्राची उभारणी लवकर करण्यात येणार आहे मागील चार दिवसांपूर्वी वसमत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी अनेक हळद उत्पादक शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले होते . हेमंत पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राला निश्चितच गती मिळेल व त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल अशी आशा आता हिंगोली जिल्हा वाशियाना लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here