Home बुलढाणा EXCLUSIVE – खंडणीखोर आमदार गायकवाडांना बरळण्याचा आजार! – सद्बुद्धी दे दुर्बुद्धी दूर...

EXCLUSIVE – खंडणीखोर आमदार गायकवाडांना बरळण्याचा आजार! – सद्बुद्धी दे दुर्बुद्धी दूर कर.. असे साकडे घालत वाटले अकरा रुपयांचे मुरमुरे! – शंखपुष्पी सायरप देखील आमदारासाठी सप्रेम भेट ! – ‘जीभ छाटण्याच्या’ वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध ! म्हणाले..

18
0

आशाताई बच्छाव

1000753321.jpg

EXCLUSIVE – खंडणीखोर आमदार गायकवाडांना बरळण्याचा आजार! – सद्बुद्धी दे दुर्बुद्धी दूर कर.. असे साकडे घालत वाटले अकरा रुपयांचे मुरमुरे! – शंखपुष्पी सायरप देखील आमदारासाठी सप्रेम भेट ! – ‘जीभ छाटण्याच्या’ वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध ! म्हणाले..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर ‘जीभ छाटून 11 लाख बक्षीस देण्याचे’ वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध नोंदवित प्रत प्रतिक्रिया व्यक्त केली. गणरायाच्या मंदिरात कार्यकर्त्यांसह जाऊन ‘हे दयाघना.. ‘सद्बुद्धी दे दुर्बुद्धी दूर कर..’ असे साकडे घालण्यात येऊन 11 रुपयांचे मुरमुरे वाटण्यात आले. यावेळी शंखपुष्पी औषधाची बाटली आमदार
गायकवाड यांना सप्रेम भेट देत असल्याचे सपकाळ यांनी सांगून तीव्र निषेध व्यक्त केला.

आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड यांना सतत चर्चेत राहण्याची खोड आहे. आज ते पुन्हा बरळले. एक खंडणी कोर वर्गणी खोर माणूस 11 लाखाची बक्षीस देण्याच्या स्तराला लागला हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे दुर्भाग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर संविधान सभेमध्ये राहुल गांधी यांचे पंजोबा सभागृहातील नेते होते. संविधान ज्यांच्या साक्षीने पारित झाले त्यांच्या नातवाला बेजबाबदारपणे धमक्या दिल्या जात असेल
तर कुठे तरी आता मानसिक दिवाळखोरीची परिसीमा दिसून येत आहे. ज्यांचे वडील, आजी देशासाठी शहीद झाले. त्यांच्या विषयी असे बोलणे योग्य नसून राहुल गांधींचे वक्तव्य समजून घेतल्या जात नसेल तर नीट समजून घ्यावे. मात्र तेवढी मानसिकता त्यांच्यात दिसून येत नाही त्यामुळे बरळण्याचा जो आजार झाला तो लवकर बरा व्हावा अशी गणरायाला मी प्रार्थना करतो.. शिवाय त्यांना शंखपुष्पी सायरप सप्रेम भेट देत आहो.. त्यांनी आमदार आहोत याची जाणीव ठेवावी.. छपरीपणा सोडावा. त्यांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी आणि दुर्गंधी दूर करावी अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करीत असल्याची पारखड प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here