Home बुलढाणा तळीरामांचा त्रास तर मांसविक्रीतून भाविकांची विटंबना ! – माँ जिजाऊ नगरी व...

तळीरामांचा त्रास तर मांसविक्रीतून भाविकांची विटंबना ! – माँ जिजाऊ नगरी व संत शेगाव नगरीत मांस व मद्यविक्रीची दुकाने शहराच्या 3 किमी अंतरावर स्थानांतरित करावे अन्यथा बेमुदत उपोषण !

27
0

आशाताई बच्छाव

1000753295.jpg

तळीरामांचा त्रास तर मांसविक्रीतून भाविकांची विटंबना ! – माँ जिजाऊ नगरी व संत शेगाव नगरीत मांस व मद्यविक्रीची दुकाने शहराच्या 3 किमी अंतरावर स्थानांतरित करावे अन्यथा बेमुदत उपोषण !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा:- बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण भारत प्रसिद्ध असलेले जागतिक तीर्थक्षेत्र दर्जाचे माँ जिजाऊंचे माहेरघर सिंदखेडराजा व विदर्भाची पंढरी म्हणून परिचीत संत गजानन महाराज शेगाव या दोन्ही ठिकाणच्या भाविकांना दारुड्यांचा त्रास होत असून भावन दुखावत असल्याने
देशी व विदेशी दारूचे दुकाने व मास विक्रीची दुकाने या शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय.

संपूर्ण भारतातून नव्हे तर संपूर्ण जगातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ व राजमाता जिजाऊंचे माहेरघर असलेले सिंदखेडराजा येथे पर्यटन म्हणून राजवाड्याला भेट देण्यासाठी येत असतात तसेच विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेले संत गजानन महाराज शेगाव येथेही मोठ्या प्रमाणे भक्ती भावाने गजानन महाराजांचे भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात मात्र या दोन्ही ठिकाणी शासनमान्य देशी दारूचे दुकान व विदेशी दारूचे दुकान रोडवरच
असल्याने मोठ्या प्रमाणात दारू पिणाऱ्या लोकांचा त्रास हा पर्यटनासाठी आलेल्या व दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांना मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच मांस विक्रीचे दुकाने सुद्धा थाटण्यात आल्याने मांस विक्रीमुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांची मोठ्या प्रमाणात विटंबना होत आहे. त्यामुळे माँ जिजाऊ नगरी व संत शेगाव नगरीत मांस व मद्यविक्री शहराच्या 3 किमी अंतरावर स्थानांतरित करावी अन्यथा 19 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सुनिता श्री किसन भांड, लता सखाराम घाईत, जिजाबाई भगवान सदावर्ते यांनी संबंधित अधिकारी यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here