Home बुलढाणा ‘संसार उध्वस्त होतोय.. साहेब कारवाई करा!’ – मौजे पिंपळनेर येथे वाहताहेत अवैध...

‘संसार उध्वस्त होतोय.. साहेब कारवाई करा!’ – मौजे पिंपळनेर येथे वाहताहेत अवैध दारूचे लोट ! –

24
0

आशाताई बच्छाव

1000753239.jpg

‘संसार उध्वस्त होतोय.. साहेब कारवाई करा!’ – मौजे पिंपळनेर येथे वाहताहेत अवैध दारूचे लोट ! – ग्रामपंचायत सह ग्रामस्थांची दारूबंदीची मागणी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा लोणार तालुक्यातील मौजे पिंपळनेर गावात खुलेआम अवैध दारू विक्री होत
आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात तरूण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने त्यांचे भविष्यही अंधकारमय होत आहे, त्यामुळे गावातील दारूविक्री बंद करण्याची कारवाई करा, अशी मागणी लोणार येथील ठाणेदारांना करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
लोणार तालुक्यातील मौजे पिंपळनेर गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. त्यामुळे तरूण पिढी दारूच्या आहारी जात आहेत. गावातील तरूण दरदिवशी दारू पिऊन गावात भांडण-तंटे करून शांतता भंग करीत आहेत, तसेच दारूच्या
व्यसनापायी अनेक लोकांचे हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सध्या गणेश उत्सव असल्याने मद्यपींचा धिंगाणा वाढला आहे. तसेच गावालगत वाईन बार असून या वाईन बार मालकाने ग्रामपंचायत ची कोणत्याही प्रकारची एनओसी न घेता अनाधिकृत लायसन्स वर बार सुरू केला आहे. अवैध दारू बंदी बाबत या संदर्भात ग्रामपंचायत ने ऑगस्ट महिन्यात ठराव घेतला आहे. परंतु दारू विक्री सुरूच असल्याने या गंभीर समस्येची सोडवणूक करावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशा मागणीचे निवेदन तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश दराडे यांच्यासह सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी आणि महिलांनी ठाणेदार यांना दिले आहे.

Previous articleअखेर पैनगंगा नदी पात्रात रविंद्र नन्हईचा मृतदेह सापडला! – साखरखेर्डा हळहळले!
Next articleभुमराळ्यात एक लाखांची घरफोडी ! – कुटुंबाला घरातील खोलीत कोंडून केली चोरी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here