Home बीड बीड शहरात दारू ढोसून गाडी चालविणाऱ्या चालकांना खाकीचा दणका; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने...

बीड शहरात दारू ढोसून गाडी चालविणाऱ्या चालकांना खाकीचा दणका; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने दोन नंबरवाले धास्तावले

20
0

आशाताई बच्छाव

1000751086.jpg

बीड शहरात दारू ढोसून गाडी चालविणाऱ्या चालकांना खाकीचा दणका; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने दोन नंबरवाले धास्तावले

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि:१५ बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शुक्रवारी (दि.१३) शहरातील २० बियर शॉप चालकांवर कारवाई केली असून १४ तास उलटत नाही तोच शनिवारी (दि.१४) बीड शहरामध्ये दारू पिऊन गाड्या चालविणाऱ्या १९ जणांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. सलग दोन दिवसापासून बारगळ यांनी बीड शहरात केलेल्या कारवायांमुळे अवैद्य धंद्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, वाहतूक शाखेचे प्रमुख सुभाष सानप, पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांचा या कारवाईत सहभाग होता. शुक्रवार रात्री बीड शहरातील २० बियर शॉपीवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतंत्र टीम तयार करून एकाच वेळी छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानंतर २० बियर शॉपिंग मधून मद्यपींना त्याच ठिकाणी दारू पिण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यानुसार संबंधित चालकावर बीड शहर, शिवाजीनगर आणि पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान शुक्रवारी या कारवाया झाल्यानंतर शनिवारी रात्री दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या १९ जणांवर एसपींकडून कारवायांचा बडगा उभारण्यात आला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका, बार्शी नाका, महालक्ष्मी चौक,चरहाटा फाट्यावर पोलिसांनी सापळा रचून या कारवाया केल्या आहेत. दरम्यान मागच्या दोन दिवसात अविनाश बारगळ यांनी बीडमध्ये केलेल्या कारवाया जिल्ह्यात चर्चेचा भाग ठरल्या आहेत.

Previous articleगडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील दुर्गम भागातील नागरिकांचा आरोग्याचा दररोज होतोय खेळ !..
Next articleमोकभणगीत रक्तदान शिबीर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here