Home बुलढाणा नागरिक व चोरट्यांचा मध्यरात्रीचा थरार ! -निर्दयीपणे गायी कोंबल्या अन् चोरट्यांची गाडी...

नागरिक व चोरट्यांचा मध्यरात्रीचा थरार ! -निर्दयीपणे गायी कोंबल्या अन् चोरट्यांची गाडी चिखलात रुतली ! -नागरिकांचा सिनेस्टाईल पाठलाग.. गायींना जीवदान.. उद्विग्न जमावाने गाडी फोडली!

40
0

आशाताई बच्छाव

1000749860.jpg

नागरिक व चोरट्यांचा मध्यरात्रीचा थरार ! -निर्दयीपणे गायी कोंबल्या अन् चोरट्यांची गाडी चिखलात रुतली ! -नागरिकांचा सिनेस्टाईल पाठलाग.. गायींना जीवदान.. उद्विग्न जमावाने गाडी फोडली!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातील घाटावर आणि घाटाखाली गोवंश तस्करी केली जात आहे. मलकापुरात तर गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून पशुधनाची चोरी वाढीस लागली असून काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गायी चोरण्याचा निषफळ प्रयत्न केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात चोरट्यांनी दाखल होऊन ४
गायींना इनोव्हा गाडीत निर्दयीपणे कोंबले आणि गाडी सुरू केली असता सतर्क नागरिकांनी या गाडीचा पाठलाग केला. दरम्यान चोरट्यांची गाडी चिखलात रुतल्याने गायींना जीवदान मिळाले परंतु चोरटे पसार झाले आहेत. या रोषात्मक घटनेमुळे नागरिकांनी चोरट्यांच्या इनोव्हा गाडीची तोडफोड केली आहे.
मलकापूर शहर पोलीस ठाण्यात पशुधन चोरीच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. 13 सप्टेंबरला श्रीराम नगर परिसरात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास पुन्हा गोवंश चोरीची घटना घडली. रघुनाथ नारायण बोरले यांच्या घराजवळ असणाऱ्या गायींना अज्ञात चोरांनी एमएच १५ डीएस ९९३२ या इनोव्हा गाडीमध्ये निर्दयीपणे दोरीने बांधून डांबले होते. दरम्यान
पशुपालक रघुनाथ नारायण बोरले यांचे या घटनेकडे लक्ष गेल्याने त्यांनी सदर गाडीचा पाठलाग करीत आरडा ओरड करून नागरिकांना जमवले. नागरिकांचा जमाव या गाडीच्या मागे धावल्याने ईनोवा गाडी अनियंत्रित होऊन चिखलात फसली. त्यामुळे चोरट्यांनी गाडी सोडून पोबारा केला. त्यानंतर उद्विग्न झालेल्या जमावाने सदर गाडीची तोडफोड केली. सदर गाडीमध्ये गुंगीचे औषध देखील आढळून आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुसळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here