Home अमरावती ११०० किलोमीटरहून डीबीने आणला सराफाला लुटणारा मुख्य आरोपी. गाडगे नगर पोलिसांचे यश...

११०० किलोमीटरहून डीबीने आणला सराफाला लुटणारा मुख्य आरोपी. गाडगे नगर पोलिसांचे यश , पिस्टलच्या धाकावर लुटण्याचे प्रकरण.

58
0

आशाताई बच्छाव

1000747646.jpg

११०० किलोमीटरहून डीबीने आणला सराफाला लुटणारा मुख्य आरोपी. गाडगे नगर पोलिसांचे यश , पिस्टलच्या धाकावर लुटण्याचे प्रकरण.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती येथील सुवर्णकार अरविंद जावरे यांच्याकडील चांदीचे १५ किलोची बॅग हीस्कावुन पळ काढणाऱ्या लुटरींच्या मोर्चाला अटक करण्यात गाडगे नगर पोलिसांच्या डीबी पथकाला यश आले. धनंजय योगेंद्रसिंग यादव वय २५ बजनखान अंत जि. प्रतापगड उत्तर प्रदेश याला शुक्रवारी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. गाडगे नगर पोलीस त्याला घेऊन शनिवारी अमरावती परतले. यापूर्वी या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. धनंजय योगेंद्रसिंग यादव हा लूट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेखा कॉलनी येथील अरविंद उत्तमराव जावरे ५५ वय, जवाहर नगर हे चार सप्टेंबर रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास वडला सोबत मोठे आपल्या ज्वेलरी शाॅपकडे जात होते. दरम्यान शीतला माता मंदिर जवाहर नगर येथे चार ते पाच माननीय त्यांना अडविले. आरोपींनी मोपेडच्या पायदनावरील आर्टिकल असलेली १५ किलो वजनाची बॅग जबरदस्तीने हीस्कवली. जावरे यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना पीस्टल दाखविली. माराहान देखील केली होती. याप्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी दरोडाच्या गुन्हा दाखल केला होता. आरोपी प्रतापगडी व दर्यापूर, अमरावतीचे. याप्रकरणी गुन्हा शाखा युनिट ऐकने यापूर्वी नागपूर येथून आरोपी गॅसउद्दीन वाहजोद्दीन कुरेशी, मोहम्मद सादिक खान हारून खान, प्रेम उर्फ प्रेमदास महादेवराव नितनवरे, विनोद शंकरराव गिरे, व संजय बाबुलाल बीनकर यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी हे उत्तर प्रदेशात पळून गेल्याने गाडगे नगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रतापगड येथे गेले होते. तेथून शुक्रवारी सायंकाळी आरोपी धनंजय यादव याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगे नगरचे ठाणेदार प्रशांत माने यांच्या नेतृत्वात डीबी प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरक्षक मनोज मानकर, उपनिरीक्षक संजय डाखोरे, अमलदार भारत वानखडे, संजय इंगळे, गुलरेज खान, नितीन कांबळी, सागर भोजने यांनी ही कारवाई केली.

Previous articleशिवनाळा चौ. येथील प्रकार : साहेब घर देता का घर..! ■ घरकूल योजनेच्या लाभांपासून लाभार्थी वंचीत
Next articleएका हातात स्टेरिंग, दुसऱ्या हातात मोबाईल;हजारांचा दंड १.३२ लाख चालकांना दंड,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here