Home भंडारा रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, 55 जणांनी रक्तदान आणि 90 जणांची...

रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, 55 जणांनी रक्तदान आणि 90 जणांची केली नेत्र तपासणी

82
0

आशाताई बच्छाव

1000746396.jpg

रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, 55 जणांनी रक्तदान आणि 90 जणांची केली नेत्र तपासणी

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भंडारा- पवनी विधानसभा प्रमुख नरेंद्रभाऊ पहाडे यांच्या सौजन्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तथा नरेंद्र पहाडे मित्र परिवार च्या वतीने पवनी तालुक्यातील ग्राम मांगली(चौ.) येथील हनुमान मंदिर प्रांगणात होतकरू गरीब शेतकरी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
“रक्तदान हे महान दान आहे, त्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी रक्तदान केले पाहिजे. रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात.” असे आवाहन नरेंद्रभाऊ पहाडे यांनी या प्रसंगी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांसह इतरांनीही रक्तदान केले. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिरात 55 जणांनी रक्तदान केले तर 90 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.
या शिबाराला ग्रामपंचायत सदस्य चेतन पडोळे, महिंद्र रंगारी, चंद्रशेखर पडोळे, सोनू पडोळे, निर्वाण पडोळे, मनीष गभाने, गणेश खंदाडे, प्रमोदजी वैद्य सर, नारायणजी पडोळे, गिरिधर भुरे, घनश्याम पडोळे, दीपक बावनकर, नूतन जांभुळकर, दुर्योधन वैद्य, भूषण तळेकर, युगल वैद्य, हर्षद पडोळे, गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here