Home जालना कवयित्री शिल्पा देशपांडे यांना ११ हजारांचा पुरस्कार जाहीर

कवयित्री शिल्पा देशपांडे यांना ११ हजारांचा पुरस्कार जाहीर

24
0

आशाताई बच्छाव

1000744252.jpg

जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): कविवर्य प्रा. जयराम खेडेकर यांना एमजीएमचा एक लाख रुपयांचा तर कवयित्री शिल्पा देशपांडे यांना 11 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हे पुरस्कार 18 सप्टेंबर रोजी देण्यात येणार असून त्यांनतर लगेचच काव्य मैफिल रंगणार आहे, अशी माहिती प्रा.जयराम खेडेकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत अधिक माहिती प्रा. खेडेकर म्हणाले की, निखळ विशूध्द व्यापारी जालना शहराला नकाशात कवितेचं गांव म्हणून ज्यानी ओळख दिली; त्यामुळे कवितेचं समग्र योगदान छत्रपती संभाजीनगर या महदनीय संस्थेचा ’कवितागौरव’ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार खेडेकर यांना घोषित झाला असून ऊमी ट्रस्ट जालना तर्फे राज्यस्तरीय स्व. कविवर्य ना. धो. महानोर काव्यपुरस्कार प्रतिभावंत, प्रयोगशिल कवयित्री शिल्पा देशपांडे, मुंबई यांना जाहीर झाला आहे.
उपरोक्त कौतुक सोहळा मस्त फकीर कविवर्य फ.मुं.शिंदे, विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते आणि भगवानराव काळे कार्लेकर व प्राचार्य डॉ.अंबादास कायंदे यांच्या उपस्थितीत तर अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर भांदरगे पाटील यांना निमंत्रित केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.गोवर्धन मुळक, रेवगांवकर हे करणार आहेत. ’कवितागौरव पुरस्कार’ ः पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम 1,00,000/- व ’काव्यपुरस्कार’ :  पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम 11,000/- रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या कौतुक सोहळ्यानंतर लगेचच शब्दवेड्या प्रतिभावंत कलावंताची धुंद काव्यमैफलचे आयोजन असून त्यात  अशोक पाठक अध्यक्षः कविवर्य फ.मुं. शिंदे, शिल्पा देशपांडे, रत्ना मोहीते, कविता बोरगांवकर, माजलग किशोर जर्‍हाड, बदनापुर. प्रदिप देशमुख, मंठा. तर मुख्य भाष्यकार म्हणून प्रा. जयराम खेडेकर त्यांच्या अमीट मुद्रावंत वाटचालीचे सिंहावलोकन करतील.

Previous articleराहुल गांधी यांना धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे भाजपा विरोधात जोरदार निदर्शने. भाजपा व संघी विचारांना काढून टाकू.
Next articleभाजपा अध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण च्या वतीने निषेध आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here