Home भंडारा आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीतर्फे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा...

आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीतर्फे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला

121
0

आशाताई बच्छाव

1000744228.jpg

आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीतर्फे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला

 

संजीव भांबोरे
भंडारा,,( जिल्हा प्रतिनिधी)आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा साकोली जिल्हा भंडारा च्या वतीने लढा संघर्षाचा लढा अस्तित्वाचा न्यायमूर्ती वडणे समिती महाराष्ट्र राज्य मुंबई ला दिलेली दोन महिन्याची मुदतवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी या निषेधार्थ आक्रोश रॅली आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 ला एस डी ओ साकोली कार्यालयावर निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी सरकारला आव्हान केले तर मागण्या पूर्ण झाला नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल. त्याचप्रमाणे गोंडगोवारी समाजाचे नेते हेमराज नेवारे, गोवर्धन काळसरपे, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की ,गेल्या 70 वर्षापासून आमच्या गोंडगोवारी समाजावर अन्याय होत आहे. के. एल वडणे ही अभ्यास समिती आहे त्या अभ्यास समितीने सहा महिन्यात आपला अहवाल सादर करतो म्हणून सांगितलं परंतु पुन्हा दोन महिने मुदतवाढ दिलेली आहे .त्यामुळे मुदत वाढीवर मुदत वाढ असे देऊन गोंड गोवारी जमातीवर फार मोठ्या प्रमाणे अन्याय होत आहे आणि म्हणून हा आक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी मोठ्या संख्येने महिला ,पुरुष गोंड जमातीचे आपली वेशभूषा करून आले होते. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे भंडारा व तालुक्यातील जिल्ह्याचे पदाधिकारी सहभागी झाले होते .गोंड गोवारी समाज आपला वाद्य वाजवत डपरी वाजवत होमगार्ड परेड ग्राउंड येथून रॅली निघाली. रॅली जवळपास दीड किलोमीटर अंतरावर एवढी लांब होती. सर्व पदाधिकाऱ्यांचे भाषणे झाले. उपविभागीय अधिकारी साकोली यांना निवेदन दिले.
, मोर्चा खूप लांबच लांब होता .विविध प्रकारचे नारे देण्यात येत होते सर्वत्र एकता दिसत होती अतिशय सुंदर असं लांबलचक
मोर्चा पाहण्यात साकोलीकर आश्चर्यचकित झाले. याप्रसंगी सुक्राम राऊत, विजय वाघाडे, वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवें
चुलीराम नगोसे, गोपाळ राऊत ,माजी सरपंच रामचंद्र कोहळे ,राकेश राऊत, सोनवणे, काशिनाथ राऊत, बाबुराव वघारे, रेखा ठाकरे ,विद्या वाघाडे, वैशाली नागोसे ,बालकदास कवरे, रामू भिमटे व भरपूर गोंड गोवारी संघर्ष समिती व
वंचित बहुजन आघाडी भंडारा वा तालुक्यातील कार्यकर्ते बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleबंजारा समाजानी राजकारणाची एक दिशा ठरवावी – एस राठोड
Next articleपरळीत रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here