Home बुलढाणा गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ॲक्शन मोडवर । हातभट्टी...

गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ॲक्शन मोडवर । हातभट्टी दारू विक्रेत्यावर धाड चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त

19
0

आशाताई बच्छाव

1000744190.jpg

गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ॲक्शन मोडवर । हातभट्टी दारू विक्रेत्यावर धाड चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त ।
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- सिंदखेडराजा तालुक्यातील दिनांक ११ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सिंदखेड राजा तालुक्यामध्ये शांतता समितीच्या बैठकी घेतली यामध्ये त्यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रेत्यावर कठोर कठोर कारवाईचे संकेत दिले त्या दृष्टिकोनातून ठाणेदारांनी आपला दणका दाखवण्यास सुरुवात केली असून तालुक्यातील किनगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरखेड व वर्दडी बु . तांडा येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर
छापा टाकला,यामध्ये राम जेमा राठोड यांच्याकडे 13 लिटर हातभट्टीची दारू मिळून आली , तर पुतळाबाई श्रीराम चव्हाण या दारू विक्रेत्या महिलेजवळ हातभट्टीची दारू बनवण्याकरता लागणारा २५ लिटर मोहा सडवा मिळून आला ,त्यामुळे किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये दोघाविरुद्ध अप नं . २०० , २०१, / २४, क ६५ इम दाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, सदर पथकामध्ये साहेब पोलीस निरीक्षक विनोद नरवाडे ,पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड,पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गोरे,पोलीस शिपाई सुभाष गीते,पोलीस शिपाई अब्दुल परसू वाले,पोलीस शिपाई सलीम परसुवले,अतिश सवडे, महिला पोलीस शिपाई श्रीमती अनुराधा दुडियार
गृह रक्षक दलाचे सलीम पठाण गजानन बुरे , खरात,यांचा समावेश होता,पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गोरे करीत आहेत .

Previous articleचिखली मध्ये स्टॅम्प चा कृत्रिम तुटवडा शेतकरी हवालदिल जगावे का मारावे चिखली तहसीलदार यांनी लक्ष देण्याची गरज.
Next articleगडचिरोली शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १३१ कोटी   मंजूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here