Home जालना जि.प.केंद्रिय शाळेच्या वतीने अ.भा.भ्र.नि.सं.समीतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा सत्कार

जि.प.केंद्रिय शाळेच्या वतीने अ.भा.भ्र.नि.सं.समीतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा सत्कार

77
0

आशाताई बच्छाव

1000738769.jpg

जि.प.केंद्रिय शाळेच्या वतीने अ.भा.भ्र.नि.सं.समीतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा सत्कार
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 12/09/2024
याविषयी सविस्तर वृत्त असे की, शेळगांव आटोळ येथील आय एस ओ.मानांकन प्राप्त केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने शेळगाव आटोळ येथील सुपुत्र, अतिशय विपरीत परिस्थितीत तसेच हलाखीच्या परिस्थितीतून व सर्वसामान्य कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील एका खेडेगावात लहानाचे मोठे झालेलं एक व्यक्तिमत्त्व, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.वसंतरावजी देशमुख यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री एम.बि.सुरडकर सर यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेप्रसंगी बोलतांना मुख्याध्यापक श्री सुरडकर सर यांनी सांगितले की, या माध्यमातून शेळगांव आटोळ या गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयक माहिती देतांना त्यांनी सांगितले की, मराठी शाळा असतांनाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही व्यक्तीचे नावं इंग्रजी भाषेत लिहायला सांगितले तरी तो विद्यार्थी ते जहज लिहीतो.त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाण्याची गरज नाही.त्यांची सर्व तयारी आम्ही सर्व शिक्षक येथेच करून घेत आहोत.विशेष म्हणजे सुटीच्या दिवशीही आमची शाळा हि बंद नसते.शिक्षक स्वयंस्फूर्तीने सुटीच्या दिवशीही अतिरिक्त शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात पारंगत करण्यासाठी मेहेनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले.आमची शाळा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही क्रमांक एक वर कशी पोहोचेल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.या जिल्हा परिषद शाळेतुन आदर्श विद्यार्थी घडले पाहिजे हेच आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी श्री व्हि.एस.इंगळे सर, श्री आर.के.खेडेकर सर, श्री यु.टी.परिहार सर, श्री एस.एम.खान सर, श्री सी.जी.शेख सर, श्री डि.बि.पाटील सर, श्री बि.एम.नागपुरे सर, श्री सी.पी.सुरडकर सर , श्रीमती एस.व्ही जोशी, श्री,जी.एम.वायाळ सर (आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त) यांच्यासह सर्व शिक्षक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here