Home विदर्भ हिंगोली जिल्ह्याचे मागासलेपणाची ओळख पुसून काढणार.माजी खा. हेमंत पाटील

हिंगोली जिल्ह्याचे मागासलेपणाची ओळख पुसून काढणार.माजी खा. हेमंत पाटील

21
0

आशाताई बच्छाव

1000738716.jpg

हिंगोली जिल्ह्याचे मागासलेपणाची ओळख पुसून काढणार.माजी खा. हेमंत पाटील.                           हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ 
1.हेमंत पाटलासहित कृषी विभागालाही सेंद्रिय हळद उत्पादक शेतकऱ्याचा शेतकरी बचत शेतकरी कंपनी चा पडला विसर .
2.सत्ता गेल्यानंतर हेमंत पाटिल जिल्ह्यातील मागासलीपणाची कशी दुर करणार .
3.जिल्ह्यातील पिक विमा मिळुन ना म्हणून टाहो फोडणार्याचा शेतकऱ्याला का पडला होता विसर .
सत्ता गेल्यानंतर माजी खासदाराला कसी सुचले जिल्ह्यातील हाळद उत्पादक शेतकऱ्याचे दुप्पट उत्पादनान.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राची दुसरी सर्वसाधारण सभा वसमत पासुन जवळच असलेल्या जितुर फाटा येथे नऊ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळतो त्यातच वसमत तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र हळद पिकाची शेतकरी निवड करतात. वसमत ची कृषी उत्पन्न बाजार समितीची राज्यातील दुसरी हळदीची बाजारपेठ म्हणून ओळख आहे.
एकूणच हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळद उत्पादक शेतकरी हळदीचे उत्पादन घेतो .
एकंदरीत जगभरातील हळद उत्पादनापैकी भारतात 80 टक्के उत्पादन घेतले जाते त्यापैकी एकूणच 80 टक्के उत्पादनाच्या मोठा सिंहाचा वाटा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याला मिळतो आणि 35 ते 40% पर्यंत हिंगोली जिल्ह्यात शेतकरी हळद उत्पादन करतो हिंगोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता संपूर्ण जमीन सुपीक व मुरमाड व मोकळी आहे आशा जमिनीत कंदवर्गीय पिक मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवून देते त्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी वर्ग मोठ्या क्षेत्रफळात हळद पिकाची लागवड व उत्पादन या ठिकाण शेतकरी घेत असतात जिल्ह्यात सिद्धेश्वर ईसापुर व जिल्ह्याला लागून परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर येलदरी धरण असल्याने या धरणाचे पाणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक परिसरातून जात असल्याने त्याचा मोठा फायदा होत असतो व त्याचबरोबर पूर्णा नदीचा प्रवाह जिल्ह्याच्या सीमेवरून जात असताना त्याचे पाणी काही शेतीसाठी उपयोगी पडते त्यामुळे या भागातील शेतकरी तर पिकाबरोबर नऊ ते दहा महिन्याचे पीक म्हणून हळद या पिकाकडे अधिकचे लक्ष करतो याच धर्तीवर जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी व एकूण क्षेत्रफळ पाहता हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी हळद संशोधन केंद्र उभारण्यात आले आणि 9 सप्टेंबर रोजी हळद उत्पादक संशोधन केंद्राची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा व कार्यशाळा पार पडली या सभेच्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनय गोयल तर प्रमुख पाहुणे हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे तर हिंगोली जिल्हा परिषद चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुकर व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र कदम .डॉक्टर विजय काळे. डॉक्टर अनिल ओळंबे .नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील शेतकरी तथा पत्रकार प्रल्हाद इंगोले वसमत चे भावी आमदार राजू चापके शिवाजी काकडे संभाजी सिद्धेवार वसमत येथील हळद उद्योजक प्रमुख व्यापारी लक्ष्मीनारायण मुरक्या प्रतीक्षा पतंगे व जिल्ह्यातील निवडक व जिल्ह्याबाहेरील काही निवडक शेतकऱ्यांची कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती होती . हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असल्याचे सांगितले पण मागील पाच वर्षात राज्यात व केंद्रात सत्तेत असणाऱ्या खासदारांना सत्तेच्या काळात जिल्ह्याचे मागासले पण दिसलेच नाही का ?
का विसर पडला होता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये पडला आहे पिक विमा द्या म्हणून हिंगोलीच्या संपूर्ण शेतकऱ्यांनी अनेक वेळा आवाज उठवल्यानंतरही खासदार साहेब यांनी शेतकऱ्याचे गर्हाणे ऐकून सुद्धा मूग गिळण्याचे काम सुरू ठेवले एवढेच नव्हे तर वर्तमानपत्रातील व न्यूज चैनल मधील अनेक बातम्या यांनी पीक विम्याच्या संदर्भात आवाज उठवला होता यात कोणाचा हात आहे यातूनही अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्धी पाहायला मिळाली तरी पण हेमंत पाटलांनी स्पष्टपणे बोलून दाखवले नाही जिल्ह्याचे किंवा मतदार संघाचे खासदार या नात्याने त्यांनी गप्प राहणेच पसंत केले पण शेतकऱ्याचा प्रश्न म्हणून कधीच पाठीशी ठामपणे उभे राहिलेले पाहायला मिळत नाही तर मागील पाच वर्षात जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किती सुख सुविधा व व्यवस्था केली व केंद्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी किती योजना राबवल्या हे मात्र विसरले आहेत .
एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या पिक विमा देण्याची भूमिका स्पष्टपणे दाखवली नाही पण आज वसमत येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी हळद उत्पादक शेतकऱ्याचे उत्पादन दुप्पट करण्याचे बोलत आहेत पण कृषी विभागासहित माजी खासदारांनाही विसर पडला की तालुक्यातील व जिल्ह्यातील कृषी विभागाअंतर्गत नोंदी असलेल्या शेतकरी गट शेतकरी कंपन्या यातील ओरिजनल हळद जैविक व सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेणारा शेतकरी आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी किती टक्क्याने आहे व का दिसत नाही
कृषी विभागालाही याची जाणीव नाही त्यामुळे हा कार्यक्रम नेमका कोणासाठी कंपनी चालवणाऱ्या अध्यक्षासाठी की िल्ह्यातील राजकीय पुढार्‍यासाठी व व्यापाऱ्यासाठीआहे का हा ही प्रश्न पडलेला आहे या कार्यक्रमासाठी स्थानिक चा आजी-माजी लोकप्रतिनिधी हे कुठे दिसले नाही पण जिल्ह्यातील वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलावून मोठा गाजावाजा सुरू करून कार्यक्रम क संपन्न केला . पण स्थानिक च्या किंवा जिल्हा कृषी उत्पादन अधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्ह्यातील एकूण एकंदरीत हळद उत्पादक शेतकरी गट शेतकरी फार्मर कंपन्या किती असून त्यापैकी किती लोक त्या मार्फत आपल्या कार्यक्रमाला आले आहेत .
शेतकरी बचत गटातील व शेतकरी प्रोडूसर कंपनी च्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना बोलावून त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते असे न करता घाईघाईत हा कार्यक्रम आटोपून माजी खासदारांना कसली घाई होती हेच जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना कळेना झाले आहे ते हळदीतील उत्पादनातील तूट रोगराई पीक पद्धती यावर मार्गदर्शन करण्यासाठी व उत्पादनावर परिणाम कशामुळे होतो ह्या बाबीची प्रत्यक्ष शासनाच्या कृषी विभागातील अधिकारी व वसंतराव कृषी विद्यापीठ परभणी येथील अनुभवी हळद संशोधन अधिकाऱ्याला बोलावून कार्यक्रमाच्या ठिकाणी हळदी विषयक माहिती मार्गदर्शन देणे अत्यावश्यक होते पण हेमंत पाटलांना या सर्व गोष्टीचा विसर पडला आहे नेमकं हळद उत्पादक संशोधन केंद्र शेतकऱ्यासाठी का बलाढ्यशाही राजकीय नेत्यासाठी व व्यापाऱ्याची संघटित करून ठेवणार असा प्रश्न स्थानिक च्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना समजेना झालाय
घाईघाईत हा कार्यक्रम करून हळद संशोधन केंद्राचे कार्यक्रमाच्या नावाखाली कागदी घोडे नाचून कोट्यावधी रूपये खर्च होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here