Home बीड गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी

गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी

48
0

आशाताई बच्छाव

1000738704.jpg

गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:११  गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांनी सोमवारी सायंकाळी प्रगती सभागृहात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोदावरी नदीकाठच्या गांवाना सतर्कतेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तसेच दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण येथुन गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदी काठच्या गावात आवश्यक उपाययोजना करण्यासाठीच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यातंर्गत जायकवाडी प्रकल्प येथुन गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू केल्यामुळे पिण्याचे स्त्रोत दुषीत झाल्यास पाणी पुरवठ्याचे शुद्धीकरण करणे, गरज पडल्यास टैंकर लावणे बाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालय यांच्या सोबत संपर्क ठेवून कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या कालावधीत नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पोहोच होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित केले.
गोदावरी नदी किनारी असणाऱ्या लोकवस्तींना सावधगिरीच्या सुचना गावांमध्ये दवंडी देऊन व ईतर माध्यमातून देण्याचे ही निर्देशित केले.
अत्तिवृष्टीमध्ये सापांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्पदंश, डेंग्यूची लागण तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगांकरीता इंजेक्शन, औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य येथे उपलब्ध राहील याची जिल्हा शल्यचिकित्सक, बीड व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षात घेण्याच्या सूचना केल्या .
नदीकाठी पाळीव जनावरे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बऱ्याचदा पाण्याचा प्रवाह जास्त असतो प्रवाहामध्ये जनावरांची सांगाडे वाहत येतात, त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
जायकवाडी प्रकल्पातून एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर खबरदारीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गावामध्ये अन्नधान्याची आगाऊ व्यवस्था करावी. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेवराई व माजलगांव या तालुक्यांसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून बाधित होणाऱ्या शेतक-यांबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अशा महत्वाच्या सूचना यंत्रणेला जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केल्या आहेत.

Previous articleश्रीरामपूर मध्ये मतांसाठी धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रयत्न हाणून पाडा !
Next articleहिंगोली जिल्ह्याचे मागासलेपणाची ओळख पुसून काढणार.माजी खा. हेमंत पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here