Home जालना मौजे लोंढेवाडी  ता. जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे...

मौजे लोंढेवाडी  ता. जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांच्या हस्ते पार पडला.

22
0

आशाताई बच्छाव

1000733553.jpg

 

मौजे लोंढेवाडी  ता. जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांच्या हस्ते पार पडला.

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे ब्युरो चीफ) लोंढेवाडी गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी गावातील सरपंच निवृत्त लंके यांनी पाठपुरावा करून गावासाठी जलजीवन योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लक्ष्य रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता त्याच प्रमाणे ९५०५ योजने अंतर्गत खंडोबा मंदिर समोर तसेच शिवाजी महाराज चौक ते मारोती मंदिर या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २० लक्ष्य रुपयांचा निधी गावासाठी मा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करुन देण्यात आला होता यावेळी या सर्व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

तसेच गावकऱ्यांच्या मागणी नुसार गावातील स्मशानभूमी जवळ नालीसह सी.सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी १० लक्ष्य रुपये, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सि.सि. स्मशानभूमी रोड चे बांधकाम करण्यासाठी ७ लक्ष्य रूपये  व २५१५ योजनेअंतर्गत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लक्ष्य रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे, यावेळी या कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

तसेच शिवशंभू गणेश मंडळ, लोंढेवाडी यांच्या वतीने गावामध्ये एक गाव – एक गणपती या संकल्पनेतून सार्वजनिक गणेशउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी भास्करआबा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच गावकऱ्यांच्या वतीने झालेल्या विकासकामांबद्दल मा. भास्करआबांचे आभार मानले व गावातील काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार गावामध्ये एक सुसज्य असे वाचनालय लवकरच बांधून देऊ असे आश्वासन दिले.

Previous articleआई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !
Next articleगोदावरी नदीकाठच्या गावातील  नागरिकांनी सतर्कता बाळगावी                                             – जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here