Home सामाजिक आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

68
0

आशाताई बच्छाव

1000733551.jpg

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो
जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची
कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत
जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !
आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ?
मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?
पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?
निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची ….
थोडक्यात काय तर
दोघांपैकी एकजण गेल्यानंतर
मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे !
लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात
आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात
स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात
परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात

म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची
असं झालं तरच ते जगू शकतील
नसता ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते
वसंतराव देशमुख जालना मो.8483951442

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here