Home बुलढाणा शेतात पाणी.. डोळ्यात पाणी ! कृषी विभागाची मनमानी तर सरकारची लबाड वाणी...

शेतात पाणी.. डोळ्यात पाणी ! कृषी विभागाची मनमानी तर सरकारची लबाड वाणी !

18
0

आशाताई बच्छाव

1000733500.jpg

शेतात पाणी.. डोळ्यात पाणी ! कृषी विभागाची मनमानी तर सरकारची लबाड वाणी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा मोंढाळा गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताक्रांत असून, येथे कृषी विभागाकडून पंचनामे प्रामाणिकपणे होत नसल्याची ओरड आहे. प्रामाणिक पंचनामे करून मायबाप सरकारने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हातातून अशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावल्या गेला. आसमानी व सुलतानी संकटाने शेतकरी आधीच मेटाकोटीत आला असताना निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा
पाणी आणले. सद्यस्थितीत शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी तुंबले आहे. अनेक ठिकाणी पंचनामे गाळात रुतलेल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकार निवडणुकीचा तोंडावर घोषणांचा पाऊस पडत असून, हा पाऊस कोरडा ठरतो की काय अशी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतोय. अतिवृष्टीने पिकवलेल्या सोन्याची माती झाली आहे. मौंढाळा गावातील झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे आदर्श करणे करण्यात येऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी रेटली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here