Home जळगाव आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव येथे MH52 एकदंत भव्य संस्कृतीक महोत्सव...

आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव येथे MH52 एकदंत भव्य संस्कृतीक महोत्सव 2024 चे आयोजन

32
0

आशाताई बच्छाव

1000726661.jpg

आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव येथे MH52 एकदंत भव्य संस्कृतीक महोत्सव 2024 चे आयोजन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून व भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाऊंडेशन, चाळीसगाव आयोजित MH52 एकदंत भव्य संस्कृतीक महोत्सव 2024 चे आयोजन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील मैदानात करण्यात आले आहे
दि 7 रोजी भव्य गणपती ची स्थापना करण्यात आली याठिकाणी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
गणपती मिरवणूक आल्यावर गणपती पूजन आमदार मंगेश चव्हाण, शिवनेरी फाउंडेशन च्या सौ प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले आज चाळीसगाव येथे भव्य गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाळीसगावचा एकदंतचा आगमन सोहळा हा अत्यंत उत्साह आणि भक्तिभावाने संपन्न झाला. पारंपरिक वाद्य, संबळ, ढोल ताशे, आणि बँड पथकाच्या गजरात गणपती बाप्पाची भव्य मिरवणूक निघाली. हा नयनरम्य सोहळा पाहताना सर्व भक्तांचे मन भक्तिमय झाले. बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वजण आनंदाने नाचत होते, गाणी गात होते, आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात वातावरण गुंजत होते.
गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनावेळी सपत्नीक आरती करण्यात आली. हा क्षण अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण होता. सर्व चाळीसगाव वासीयांना बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद मिळावेत, यासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सव म्हणजे एकत्र येऊन भक्ती, संस्कृती आणि आनंदाचा संगम अनुभवण्याचा काळ आहे, आणि हा आगमन सोहळा त्याचे प्रतीक आहे. पुढील १० दिवस चाळीसगावचा एकदंत या भव्य सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची मेजवानी चाळीसगावकराना मिळणार आहे. असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

Previous articleलोंजे येथे एकावर कुऱ्हाडीने वार – डोक्याला गंभीर मार तर दोन्ही हात फ्रॅक्चर
Next articleकळवणला रविंद्र (बाबा) देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कळवण.           
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here