Home बीड परळीच्या घोंगडी बैठकीतून देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटीलांचा थेट इशारा!

परळीच्या घोंगडी बैठकीतून देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटीलांचा थेट इशारा!

21
0

आशाताई बच्छाव

1000726610.jpg

परळीच्या घोंगडी बैठकीतून देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटीलांचा थेट इशारा!

मी कोणाच्या नादी लागत नाही; माझ्याही कोणी नादी लागू नये – मनोज जरांगे पाटील

रात्री अपरात्री अनेकजण भेटायला येऊन पाय धरतात; त्यात भाजपची संख्या जास्त

मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही; प्रसंगी सरकार पडायला मागेपुढे पाहणार नाही

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: ०८ सप्टेंबर २०२४ रोजी आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्याशिवाय मराठा समाजाला गत्यंतर नाही. राजकारण येत राहील, होत राहील. मात्र अरक्षणापासून मराठा समाजाचे एकही घर वंचित राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आरक्षणाच्या लढाईत आपण आता अंतिम टप्प्यात आहोत. शासनालाही आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. सरकारने जर आरक्षण नाही दिले तर त्यांना परत आपल्याला सत्तेवर येऊ द्यायचे नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात ट्रॅप रचला आहे, दररोज एक आमदार माझ्यावर गरळ ओकत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नादाला लागू नये अन्यथा महाराष्ट्रात भाजपला बियाला माणूस उरणार नाही असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते परळी वैजनाथ येथे आयोजित घोंगडी बैठकीत बोलत होते.

परळी येथील हलगे गार्डन येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जे जे लोक आणि नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात गेले आहेत त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवणार आणि घरी बसवणार. मराठा समाजाच्या आरक्षणात राजकारण आणू नये अशी कळकळीची या राज्यकर्त्यांना विनंती आहे. फडणवीसांनी माझ्यावर सापळे रचण्यात वेळ घालवण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाजाच्या घरात जाऊन बसावे आणि त्यांच्या वेदना समजून घ्याव्यात म्हणजे त्यांना समजेल की मराठा समाजाला आरक्षण कशासाठी लागते? मराठा समाजाच्या वेदना आणि अडचणी प्रचंड आहेत त्यांनी अगोदर त्या समजून घ्याव्यात. कष्ट करून लेकर शिकवायला काय संघर्ष करावा लागतो हे या निष्ठुर शासनाला कधीही कळणार नाही. मराठ्यांनी फडणवीसांनी मनमानी ऐकून घेण्यासाठी लेकरं शिकवले नाहीत.

मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर उठले आहेत. फडणवीस मराठ्यांच्या लेकरांना तडपायची वेळ आणत आहेत. आमचे लेकरे आम्ही कष्ट करून शिकवत आहोत. मराठा आणि कुणबी एक असताना शासन जाणीवपूर्वक या गोष्टी मान्य करत नाही. ज्या नोंदी सापडल्या त्याही रोखून धरण्याचे कटकारस्थान हे सरकार करीत आहे. जे राज्यकर्ते स्वतः जातीयवादी आहेत, तेच आम्हाला जातीयवाद शिकवतात याचं आश्चर्य वाटत. मराठ्यांनी मनावर घेतल तर आरक्षणाच्या विरोधातील नेत्यांना घराच्या बाहेर पडू देणार नाहीत. मात्र हा समाज माझ्याकडे पाहून गप्प बसतो आहे. मराठा समाजाच्या विरोधात गेले तर एकही आमदार महाराष्ट्रात निवडून येऊ देणार नाही.

मराठा समाज ज्यांना निवडून देतो, ज्यांना मतदान करतो, ज्यांच्या निवडून आल्यानंतर मिरवणुका काढून डिजे वर नाचतो. त्याच समाजाच्या विरोधात हे निवडून गेलेले आमदार काम करत आहेत. त्यामुळे आता इथून पुढे मराठा समाजाने समाजाचे शत्रू ओळखले पाहिजेत. त्यांना येथून पुढे दरात उभे करू नका. आपलीच लेकरे आपल्याला विचारणार आहेत. हे हरामखोरी राज्यकर्ते तुम्हाला विचारायला येणार नाहीत असे प्रखर विचार मनोज जरांगे पाटील यांनी परळी शहरातील घोंगडी बैठकीत व्यक्त केले. मी समाजासाठी पोटाला चिमटा घेऊन उपाशी मेलोय, या कुटील राज्यकर्त्यांना अंगावर घेतलंय. मी यापुढेही समाजासाठी माझा जीव देईल मात्र समाज बांधवांनी या असल्या राज्यकर्त्यांच्या पाठीमागे धाऊ नका असेही ते म्हणाले.

भव्यदिव्य शोभायात्रा आणि सत्कार
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे रविवारी परळी वैजनाथ येथे घोंगडी बैठकीच्या निमित्ताने आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मराठा समाज बांधवांच्या वतीने जरांगे पाटील यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

रात्रीचे भेटण्यास येणाऱ्यांची तर आणखी नावेच सांगितली नाही मी
मागील अनेक दिवसांपासून माझ्या भेटीला अनेक नेते येत आहेत. रात्रीच्या भेटी घेणारे तर संख्या खूप मोठी आहे. त्यातही भाजपचे लोक जास्त आहेत. राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याने ते मला भेटायला येतात, म्हणून मला रात्रभर जागावे लागते. मला कुठल्याही राजकीय भूमिकेत अजिबात जायचे नाही. मी कोणत्याही नेत्यांच्या स्वतःहून वाट्याला गेलो नाही. मात्र जर माझ्या आणि समाजाच्या वाट्याला गेले तर मात्र त्यांची हायगय केली जाणार नाही. मी असल्यांना अजिबात सुट्टी देणार नाही हे परळीच्या पवित्र भूमीतून सांगतो असाही इशारा त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here