Home बुलढाणा तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; तुपकरांची तब्येत प्रचंड खालावली! हाइपोग्लाइसीमिया मुळे कोमात...

तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; तुपकरांची तब्येत प्रचंड खालावली! हाइपोग्लाइसीमिया मुळे कोमात जाण्याची शक्यता? तुपकर म्हणाले, मी शहीद व्हायला तयार..पण शेतकऱ्यांचं भलं करा! उद्या राज्यात शेतकरी करणार चक्काजाम; सोमवारी समृध्दी महामार्गावरही घुसणार….

40
0

आशाताई बच्छाव

1000725507.jpg

तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; तुपकरांची तब्येत प्रचंड खालावली! हाइपोग्लाइसीमिया मुळे कोमात जाण्याची शक्यता? तुपकर म्हणाले, मी शहीद व्हायला तयार..पण शेतकऱ्यांचं भलं करा! उद्या राज्यात शेतकरी करणार चक्काजाम; सोमवारी समृध्दी महामार्गावरही घुसणार….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
सिंदखेडराजा:– बुलढाणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. पोटात अन्नाचा कणही न घेतल्यामुळे रविकांत तुपकर यांची तब्येत आज प्रचंड खालावली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण ५० पेक्षा कमी झाल्याने तुपकर हाइपोग्लाइसीमियामुळे पुढच्या काही तासांत कोमात जाऊ शकतात असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारच्या वतीने काल ता.६ सप्टेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रविकांत तुपकर यांच्याशी फोन वरून चर्चा केली, उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार नाहीच अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. दरम्यान आता हे आंदोलन चांगलेच चिघळण्याची चिन्हे असून शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. उद्या,८ सप्टेंबरला रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ राज्यात चक्काजाम आंदोलन होणार आहे, शिवाय ९ सप्टेंबर रोजी समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सोयाबीन कापसाची दरवाढ, पिकविम्याची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड यासह विविध मुद्यांवर रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा वणवा आता गावागावात पेटत आहे. गावागावात प्रभातफेऱ्या, ग्रामसभांचे ठराव याद्वारे तुपकर यांच्या आंदोलनाला समर्थन वाढत आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तुपकर यांची प्रकृती अधिकच खालावत चालली आहे. तुपकर मागण्यांसंदर्भात ठोस निर्णयावर ठाम आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण ५० पेक्षा कमी झाल्याने तुपकर यांना
हाइपोग्लाइसीमिया होण्याचा धोका वाढला आहे. ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यास रविकांत तुपकर पुढच्या काही तासांत कोमात जाऊ शकतात.
मी शहीद व्हायला तयार..
माझी सरकारला एलर्जी असेल तर मला बाजूला करा. मी शहीद व्हायला तयार आहे,पण शेतकऱ्यांचं भलं करा, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, जोपर्यंत मागण्यांवर सकारात्मक होत नाही तोपर्यंत जीव गेला तरी पोटात अन्नाचा कणही घेणार नाही म्हणजे नाहीच असे तुपकर यांनी ठणकावले आहे…

Previous articleवसमत शहरात‌ सणासुदीच्या काळात शासकिय ईमारती व सार्वजनिक ठिकाण बनले दारूड्याचे आड्डे
Next articleभर पावसात शिवभक्तांनी घेतला शिवमहापुराणाचा आनंद खंडाळ्यात शिव महापुराण कथा उत्साहात संपन्न!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here