Home बुलढाणा ओला दुष्काळ जाहीर करून सर्वसकट नुकसान भरपाई देण्यात यावी….

ओला दुष्काळ जाहीर करून सर्वसकट नुकसान भरपाई देण्यात यावी….

26
0

आशाताई बच्छाव

1000718995.jpg

ओला दुष्काळ जाहीर करून सर्वसकट नुकसान भरपाई देण्यात यावी….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मोताळा :- तालुक्यात
जवळपास गेल्या एक दिड महिन्यापासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामध्ये कधी रिमझीम तर कधी मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस सुरू असतांना शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामध्ये कपाशी पिवळसर पडून तिला फुल पाती कैरी अजिबात नाहीशी झाली आहे, सोयाबीन, मका, उडीद मुंग, ज्वारी आदि पिकांची पण जास्त पावसामुळे फळधारणा होत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी चिंचाग्रस झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांने शावकाराकडुन व्याजाने आनुन पैसे बी- बियाणे, रासायनिक खते, फवारीचे कीटकनाशक आणुन मशागत पूर्ण केली आहे. पाऊस जास्त असल्यामुळे निंदनाला खुप खर्च लावून आता पिक येणार या आशेवर शेतकरी असतांना मात्र
त्याच्या आशेची निराशा झाली आहे. एकीकडे शासनाचे धोरणं बी बीयाण्यांच्या, खतांच्या किमता आभाळाला गवसनी घालत असतांना शेतमालाला कवळीमोल भाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात कापूस सोयाबीन पडलेलं असतांना हे आस्मानी संकट देखील शेतकऱ्यांच्या जिवावर उठलं आहे शेतकऱ्यांचे आतोनान नुकसान झाले आहे त्यांच्या समोर आत्महत्येशिवाय पर्याय आता राहिला नाही आहे त्यात शासनाने याची दखल घेऊन सरसकट मोताळा तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन झालेल्या नुकसानीची १००%
नुकसान
नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here