Home बुलढाणा रविकांत तुपकरांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला विविध पक्ष – संघटनांचा मिळतोय पाठिंबा, राष्ट्रवादी...

रविकांत तुपकरांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला विविध पक्ष – संघटनांचा मिळतोय पाठिंबा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख व गायत्री शिंगणे यांचे आंदोलन स्थळी भेट देवून दिला पाठिंबा…..

25
0

आशाताई बच्छाव

1000718985.jpg

रविकांत तुपकरांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला विविध पक्ष – संघटनांचा मिळतोय पाठिंबा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख व गायत्री शिंगणे यांचे आंदोलन स्थळी भेट देवून दिला पाठिंबा…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
सिंदखेडराजा :- बुलढाणा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज ५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान या आंदोलनाला विविध संघटना तसेच पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली व या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला तसेच गायत्री शिंगणे यांनी देखील आंदोलन स्थळी पोचून या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.
सोयाबीन – कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन तुपकरांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या या लढ्याला आता सर्वच स्तरातून पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. राज्यभरातील विविध संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी आपला पाठिंबा जाहीर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली. आम्ही आपल्या सोबत असून या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी मेहबूब शेख यांनी सांगितले. तसेच गायत्री शिंगणे यांनी देखील आंदोलन स्थळी पोहोचून रविकांत तुपकर यांची भेट घेतली व त्यांच्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा असल्याचे पत्रच त्यांनी रविकांत तुपकारांना सुपूर्द केले. त्याचबरोबर ग्रामसेवक संघटनेसह विविध संघटनांनी तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान काल प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्यासह तहसीलदार, कृषी अधिकारी, पिकविमा कंपनीचे अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी आंदोलन स्थळी पोहोचून रविकांत तुपकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील या अधिकाऱ्यांनी यावेळी केली. परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत माघार नाही, असे रविकांत तुपकर यांनी ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पिकविमा कंपनीवर गुन्हे दाखल करून त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास बाध्य करा व बाकी मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावे, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरूच राहणार असून शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास हे आंदोलन राज्यभर पेटेल, असा इशाराही यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.

Previous articleनांदगाव विधानसभेसाठी राजेंद्र पाटील राऊत यांचा मोठा निर्णय..!
Next articleओला दुष्काळ जाहीर करून सर्वसकट नुकसान भरपाई देण्यात यावी….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here