Home रायगड बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात पेणमध्ये निषेध रॅली !

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात पेणमध्ये निषेध रॅली !

32
0

आशाताई बच्छाव

1000680833.jpg

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात पेणमध्ये निषेध रॅली !

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

सध्या जगातील हिंदू संकटात आहे. सर्वसाधारण विचार करता जगात हिंदूंची असणारी संख्या व हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारमुळे कमी होताना दिसत आहे. अनेक जातीच्या लोकांना आपला देश सोडल्यांतर निर्वासित म्हणून दूसऱ्या देशात त्यांना आश्रय दिला जातो. परंतु भारत देश सोडला तर हिंदूंना कुठेही आधार नाही. सध्या बांलादेशात जे काही राजकारण सुरू आहे त्यामध्ये हिंदू भरडला जातांना दिसत आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी काळ पेणमध्ये हिंदू संघटनांच्यावतीने निषेध फेरी काढण्यात आली होती.

यावेळी फेरीमध्ये मंगल पाटील, अॅड. गणेश म्हात्रे, भास्कर पाटील, भोपातराव महाराज, महेश पाटील, दिनेश पाटील, चंद्रकांत पाटील, अरुण भोईर आदींसह हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, शहरातील कोतवाल चौक ते बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालय पर्यंत घोषणा देत संपूर्ण पेण शहरातून फेरी काढण्यात आली. निषेध रॅलीमध्ये शहरातील अनेक हिंदू बांधव उपस्थित राहून बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला.

या फेरीवेळी ‘बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकला’, ‘हिंदूवरील अत्याचार सहन करणार नाही’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पेण शहरात आणि नाक्यांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी प्रांत कार्यालय अधिकारी अरुण म्हात्रे यांना बांगलादेशातील होत असलेल्या अन्यायाबद्दल निवेदन सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here