आशाताई बच्छाव
तुमसर येथे महाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून मूक आंदोलन
संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी) महाविकास आघाडीतर्फे बदलापूर येथील चिमुकल्या मुली सोबत आणि पश्चिम बंगाल येथील ट्रेनिं डॉक्टर यांच्याशी लैंगिक शोषण आणि बलात्कार करून तिला मारल्या गेल्यामुळे महाविकास आघाडीने शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पुकारलेला होता आणि त्या संबंधाने सर्व कार्यक्रम आयोजित होता परंतु त्यामध्ये उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे आणि उच्च न्यायालयाच्या सन्मान ठेवल्या पाहिजे आणि त्याच्या एक आधार त्यांच्या निर्णयाच्या बाजूने महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी शनिवारी बंद जे काही कार्यक्रम होता ते मागे घेतला आणि मुख निषेध म्हणून काळ्याफिती लावून तोंडावर आणि हातावर काळी पट्टी लावून त्याच्या निषेध कार्यक्रम बावनकर चौकात महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले. यात महविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते सर्व कार्यकर्ते आणि काही चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गावातील नागरिकानी सहभाग नोंदविला. यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले, मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, माजी नगराध्यक्ष अमर रगडे, प्रदेश प्रतिनिधी प्रमोद तीतीरमारे, सभापती रमेश पारधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, रायुका जिल्हाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे,तालुका अध्यक्ष प्रमोद कटरे, राजेश ठाकूर, शहर अध्यक्ष कान्हा बावनकर, शैलेश पडोळे, दिलीप तिमांडे, श अमित मेश्राम ,शंकर राऊत, जय डोंगरे, कृष्णकांत बघेल, कुसुम कांबळे, सिमा भुरे, करुणा धुर्वे, मनिषा निखाडे, निशा गणवीर, सिमा बडवाईक, सुरेखा बारसागडे, ममता बिसेन, सुरेश मेश्राम, आशिष निखाडे, सुधा कारेमोरे, खेमराज नागफासे, जय पाटील, उज्वल सहारे, राजू उकरे, दामू भुरे, राजेश पारधी, शिव बोरकर, अशोक उईके, विनोद कोकुडे, प्रमोद घरडे, तारेंद्र डिंकवार, प्रकाश सहारे, प्रेमलाल तुमसरे, पवन खवास, रोशन ढोके, उमेश पटले, अमित लांजेवार, भास्कर सार्वे, खेमराज पंचबुद्धे, गजानन लांजेवार, दिनेश भवसागर, आलोक बनसोड, निलेश वासनिक, सचिन बडवाईक, दिलीप लांजेवार यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.