Home जालना स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी जागृत राहिला पाहिजे –डॉ. किशोर आंबेगावकर

स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी जागृत राहिला पाहिजे –डॉ. किशोर आंबेगावकर

24
0

आशाताई बच्छाव

1000674496.jpg

स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी जागृत राहिला पाहिजे –डॉ. किशोर आंबेगावकर
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 23/08/2024
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालय जे बी के विद्यालयामध्ये, व्यवसाय मार्गदर्शन समुपदेशन आणि मानव प्रचार तज्ञ, यांचे कौशल्यावर आधारित, विकास व्यवसाय मार्गदर्शन व कौल करिअर कौन्सिलिंग संदर्भात व्याख्यान झाले. या व्याख्यानाच्या दरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जागृत राहायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा तो अभ्यास असो कोणत्याही गोष्टी असो आत्ताच्या जगामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी विसरून, आत्ताच्या जगामध्ये दिसणाऱ्या मोह युक्त गोष्टी विसरून आपण अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या करिअर संदर्भामध्ये आपण समुपदेशनाच्या द्वारे मार्गदर्शनाच्या द्वारे करियर कौन्सिलिंगच्याद्वारे आपणास विविध संधी निर्माण केल्या पाहिजे. संधीचं सोनं केलं पाहिजे. आपल्याला आवड असणारे आपल्या करिअरच्या संदर्भात आपण योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे. आपण सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी आहोत शेतकऱ्यांची मुल आहोत. आपले आई-वडील शेतकरी आहेत परंतु आपल्या आई-वडिलांना कोणालाही वाटत नाही की आपण शेतकऱ्यांची मुलं असताना आपण कोणत्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यासाठी करिअर कौन्सिलिंग ची गरज आहे. स्पर्धा परीक्षेच्या द्वारे आपण कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे. तेव्हाच आपल्या संधीचे सोने होईल. त्याचबरोबर आपल्या करिअर कौन्सिलिंगच्या संदर्भात विविध अभ्यासक्रमांची आपण माहिती मिळवली पाहिजे. हे सांगत असतानाच आपल्याला कोणकोणत्या संधी आहेत कोण कोणते क्षेत्रफुली आहेत याचे सुद्धा मार्गदर्शन डॉक्टर आंबेगावकर यांनी केले. कृषी क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील सैनिक क्षेत्रातील टेक्निकल च्या संदर्भातील, इंजिनिअरिंग क्षेत्रातील, कला गुण कौशल्य क्षेत्रातील कोणते अभ्यासक्रम आपल्याला खुणावत आहेत याची सुद्धा मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. त्यांच्या एक तासाच्या व्याख्यानामध्ये सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. गोड अशा आवाजामध्ये ते सांगत असताना एकही विद्यार्थी विचलित झाला नाही. त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या करिअर गार्डनच्या संदर्भातील पुस्तकांतून त्यांनी विविध अभ्यासक्रमांची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना दिली. ते स्वतः एक कौन्सिलर असून समुपदेशनाच्या क्षेत्रात क्षे आणि मानसशास्त्री क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य महत्त्वाचा आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नंदकुमार काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव सोळंके, सखाराम बोरकर, केजी जाधव, रामदास भांगे यांचे मंचावर उपस्थित होती. कार्यक्रमांमध्ये उपस्थित यामध्ये संजीव कुलकर्णी, राजेंद्र जगताप, कैलास भुतेकर राजेश शेवाळे, रमेश इंगळे, रवींद्र मोरे, प्राध्यापक सुनील बनसोडे, वासुदेव अक्षर सागर समाधान कांबळे, दत्ता उखर्डे, रवींद्र मोरे, पाटील मॅडम शेख मॅडम, भिलावेकर मॅडम कळंबे मॅडम, लंबे मॅडम, नागोराव देशमुख दगडोबा तांबेकर दीपक देशमुख, इयत्ता आठवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here