Home गडचिरोली माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी चुटुगुंट्टा,दामपूर येथील सभा मंडप बांधकामासाठी केली...

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी चुटुगुंट्टा,दामपूर येथील सभा मंडप बांधकामासाठी केली आर्थिक मदत!

29
0

आशाताई बच्छाव

1000670790.jpg

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी चुटुगुंट्टा,दामपूर येथील सभा मंडप बांधकामासाठी केली आर्थिक मदत!

पुन्हा एकदा दानशूर राजेंनी केली गावकऱ्यांना मदत!

मुलचेरा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- तालुक्यातील चुटुगुंट्टा,दामपूर या दोन्ही गावातील गावकऱ्यांना संयुक्त रित्या हनुमान मंदिरा समोर एक सुसज्ज असा सभा मंडप बांधकाम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी आर्थिक अडचण आहे ही बाब स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या पर्यंत पाठवली त्यावेळी राजे साहेबानी 50000/-(पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत केली होती.

आता काही दिवसांनी पुन्हा चुटुगुंट्टा,दामपूर या दोन्ही गावातील स्थानिक गावकऱ्यांना सभा मंडप बांधकाम प्रगती पथावर असून काही प्रमाणात आर्थिक अडचण उद्भवत आहे,पुन्हा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे,ही माहिती राजे साहेबांना कळताच त्यांनी आपले कार्यकर्ते पाठवून त्यांना पुन्हा 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.आपण सर्वोतोपरी पुन्हा सहकार्य करणार असे आश्वासन सुद्धा दिले.

त्यावेळी संपूर्ण चुटुगुंट्टा,दामपूर येथील गावकऱ्यांनी राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले..!

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,गिरीश मद्देर्लावर सर,शंकर बुरामवार,सत्यनारायण आत्राम,सागर मडावी,संदीप बुरामवार,वैष्णव ठाकुर,राकेश गुंतावर,प्रमोद चंदावार,दानाव बाबू सुरेखा मडावी, रायसिंग दब्बा तसेच गावकरी उपस्थित होते.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळातील कायदे आणण्याची गरज- तिलक डुंगरवाल
Next articleमाहोरा परिसरात जोरदार पाऊस पडल्याने पिकांना मिळालं जीवदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here