Home जळगाव लखपती दीदीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शेतकरी संघटना पंतप्रधानांना आक्रमकपणे विरोध दर्शविणार

लखपती दीदीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शेतकरी संघटना पंतप्रधानांना आक्रमकपणे विरोध दर्शविणार

45
0

आशाताई बच्छाव

1000668773.jpg

लखपती दीदीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शेतकरी संघटना पंतप्रधानांना आक्रमकपणे विरोध दर्शविणार
पारोळा: प्रतिनीधी
जळगाव:-पंतप्रधान यांच्या हस्ते दि २५ रोजी जळगाव येथे लखपती दिदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत या कार्यक्रमात शेतकरी नेते व महाराष्ट्र शेतकरीसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनच्या सबसिडी रक्कम अदा करावी या मागणीसाठी विरोध आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलना संदर्भात संघटनेने पीएमओ कार्यालय,केंद्रीय कृषिमंत्री,मुख्यमंत्री, कृषी आयुक्त यांना इमेल च्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे.RKVY (PDMC) अनुदानाच्या प्रलंबित अनुदानामुळे आम्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संताप आणि अस्वस्थता आहे
संघटनेच्या मागण्या
RKVY प्रति ड्रॉप मोअर क्रॉप (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत वर्ष 2021-2024 साठी प्रलंबित तिसरा आणि चौथा हप्ता आणि 2024-2025 या वर्षासाठी दुसऱ्या हप्त्याची मागणी.
2023-24 या वर्षासाठी 509.99 कोटी रुपयांचा वार्षिक कृती आराखडा (केंद्राचा हिस्सा 305.99 कोटी आणि राज्याचा हिस्सा 204.00 कोटी) राज्यस्तरीय मंजुरी समितीने (SLSC) मंजूर केला आहे.
वर्ष 2023-24 मध्ये, RKVY PDMC अंतर्गत भारत सरकारकडून प्राप्त झालेला एकूण निधी रु. 92.50 कोटी (रु. 305.99 कोटींपैकी) होता, त्यामुळे शिल्लक रक्कम रु. 213.49 कोटी आहे.29/01/2024 रोजी 272.14 कोटी रुपयांच्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्याची शिल्लक रक्कम सोडण्याची मागणी करण्यात आली होती परंतु ती सोडण्यात आली नाही.
2024-25 या वर्षासाठी 667.50 कोटी रुपयांचा वार्षिक कृती आराखडा (केंद्राचा वाटा रु. 400.50 कोटी आणि राज्याचा हिस्सा रु. 267.00 कोटी) SLSC ने 03/05/2024 रोजी मंजूर केला आहे.
सन 2024-25 साठी 400.50 कोटी रुपयांच्या केंद्रीय वाट्याची मागणी 16/05/2024 रोजी भारत सरकारकडे सादर करण्यात आली आहे. केंद्राच्या हिश्श्याचा 66.75 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. तरीही 454.73 कोटी रुपयांचा केंद्रीय हिस्साआर्थिक वर्ष 2023-24 साठी अद्यापही बाकी आहे.
त्यामुळे राज्याला 2024-25 मध्ये लॉटरी बंद करावी लागली आहे. 2024-25 मध्ये सुमारे 251019 शेतकऱ्यांनी पीडीएमसी योजनेत मदत मिळण्यासाठी अर्ज केले आहेतआणि ते अद्यापही सूक्ष्म सिंचन संच बसवण्यासाठी सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
म्हणून, मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित देयांची पूर्तता करण्यासाठी RKVY कॅफेटेरिया अंतर्गत PDMC चा गतवर्षी प्रलंबित 454.73 कोटी रुपये आणि चालू वर्षाचा दुसरा हप्ता जारी करण्याची विनंती करतो.
संघटना आक्रमक
महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी केंद्र सरकार, राज्य सरकार यांना हे आश्वास्त करू इच्छितो की, वरील सर्व मागण्यांच्या संदर्भात आम्ही महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शासनाचा निषेध नोंदवला आहे. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.९ रोजी 5000 हजार शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या आक्रोश मोर्चाद्वारे शासनाचे लक्ष वेधले असता शासनाला आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असे पत्र दिले. (15) पंधरा दिवसांची कालमर्यादा दिली पण एकंदरीत मागण्या मान्य होताना दिसत नाही. हे सर्व घडत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे वरील मागण्या पूर्ण होण्यासाठी दिनांक 25/8/2024 जळगाव लखपती दीदी कार्यक्रमासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्रातील आपल्या जिल्ह्यात येणार तेव्हा संघटना त्यांना विरोध आंदोलन करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here