Home बुलढाणा ५० हजार भावांना राखी पाठवून श्वेताताईंनी साजरी केली राखी पौर्णिमा; घरी सुध्दा...

५० हजार भावांना राखी पाठवून श्वेताताईंनी साजरी केली राखी पौर्णिमा; घरी सुध्दा रक्षा बंधनासाठी भावांनी गर्दी….

24
0

आशाताई बच्छाव

1000664628.jpg

५० हजार भावांना राखी पाठवून श्वेताताईंनी साजरी केली राखी पौर्णिमा; घरी सुध्दा रक्षा बंधनासाठी भावांनी गर्दी….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली बुलढाणा :-बहिण भावाच्या पवित्र नात्याला तलम रेशमी धाग्याच्या बंधनात अधिक दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा झाला. राखी पौर्णिमेचे औचित्य साधून मागील १० वर्षांपासून दरवर्षी चिखली मतदारसंघातील भावांना आवर्जून राखी पाठवणार्या श्वेताताई महाले यांनी यंदा ५० हजार भावांना राख्या पाठवून या परंपरागत सणाला व्यापक सामाजिक आयाम दिला. आ. श्वेताताई महाले यांच्या हातून राखी बांधून घेण्यासाठी सुध्दा शेकडो भावांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.
आ. श्वेताताई महाले यांच्या वतीने २०१४ पासून दरवर्षी चिखली विधानसभा मतदारसंघातील भावांना न चुकता राखी पाठवली जाते. या राखीबरोबर एक पत्र देखील त्या पाठवतात. यावर्षी अशी पन्नास हजार पत्रे आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघातील आपल्या भावांना पाठवली आहेत. याशिवाय राखी पौर्णिमेच्या पर्वावर आ. महाले यांच्या निवासस्थानी देखील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व स्नेहीजनांनी श्वेताताईंच्या हातून राखी बांधून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सर्वांचे यथोचित स्वागत करत त्यांच्या हातावर राखीचा रेशमी धागा बांधून श्वेताताई महाले यांनी आपले बहीण भावाचे नाते अधिक घट्ट केले.
पत्रातून सादर केला वचनपूर्तीचा आलेख
यंदा पाठवलेल्या राखीसोबतच्या पत्रात आ. महाले यांनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात मतदारसंघात केलेल्या अभूतपूर्व विकासकामांचा संक्षिप्त लेखाजोखा मांडून आपल्या वचनपूर्तीचा आलेख सादर केला आहे. चिखली शहर व ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा पुरवल्या असून याशिवाय अनेक महत्त्वाची विकास कामे देखील त्यांनी मार्गी लावली आहेत. हजारो कोटी रुपयांचा विकास निधी चिखली मतदारसंघाला आणून जी अभूतपूर्व विकासकामे आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघात केली त्याचा व विधानसभेत मांडलेल्या विविध प्रश्नांचा सारांश या पत्रात वाचायला मिळतो.

Previous articleजिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत विठ्ठल जिल्ह्यात दुसरा
Next articleश्रीरामपूरात आजपासून सांस्कृतिक कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here