Home नांदेड बांग्लादेश व  पश्चिम बंगाल अत्याचार प्रकरणी हिंदुत्वादी संघटनेच्या मुखेड बंदला 100 टक्के...

बांग्लादेश व  पश्चिम बंगाल अत्याचार प्रकरणी हिंदुत्वादी संघटनेच्या मुखेड बंदला 100 टक्के प्रतिसाद.

26
0

आशाताई बच्छाव

1000664573.jpg

बांग्लादेश व  पश्चिम बंगाल अत्याचार प्रकरणी
हिंदुत्वादी संघटनेच्या मुखेड बंदला 100 टक्के प्रतिसाद.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड -बांग्लादेश मध्ये हिंदुवर अत्याचार करुन तेथील हिंदु महिला, हिंदु मंदीरे, हिंदु नागरीक व हिंदु व्यापायावर तेथील धर्मांध लोकांनी अत्याचार केला आहे. तसेच पश्चिम बंगाल मध्ये डॉक्टर युवतीववर नराधमाने बलात्कार करुन ठार केल्याप्रकरणी हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने पुकारलेल्याा मुखेड बंदला
100 टक्के प्रतिसाद पाहायला मिळाला.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व हिंदु संघटना तिव्रपणे निषेध व्यक्त करीत हिंदु अत्याचाराविरोधात व पश्चिम बंगाल बलात्कार घटनेच्या निषेधार्थ दि. 20 ऑगस्ट रोजी मुखेड बंदचे आवाहन केले होते. येथील व्यापा-यांनी व सर्व नागरीकांनी या बंद मध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला आहे.
बांग्लादेश मध्ये हिंदुवर होत असलेला अत्याचार कमी करुन व केलेल्या अत्याचायांवर कडक कार्यवाही करण्यासाठी व  पश्चिम बंगाल मध्ये डॉक्टर युवतीवर बलात्कार करुन अमानुषपणे हत्या करण्यात आली. अशा सर्व नराधामाला जलदगती कोर्टात सुनावणी करुन फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व हिंदु संघटनेच्या वतीने शहरात सकाळी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. व्यापा-यांनी अगोदर स्वयंस्फूर्तपणे अगोदरच आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवि हुंडेकर, डिएसबीचे पांडुरंग पाळेकर, पोलिस पाटील माधव टाकळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

तहसिलदार राजेश जाधव यांना घटनेचा निषेध व्यक्त करीत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी हजारो हिंदु बांधव उपस्थित होते.

Previous articleचिमुकलींसाठी आक्रोश; बदलापुरात उद्रेक, रेल्वे वाहतूक दिवसभर ठप्प
Next articleजिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत विठ्ठल जिल्ह्यात दुसरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here