Home पुणे संभाजी भिडे वगैरे काही बोलणाच्या लायकीची माणसं आहेत का? प्रश्न विचारताच भडकले...

संभाजी भिडे वगैरे काही बोलणाच्या लायकीची माणसं आहेत का? प्रश्न विचारताच भडकले शरद पवार

36
0

आशाताई बच्छाव

1000658063.jpg

संभाजी भिडे वगैरे काही बोलणाच्या लायकीची माणसं आहेत का? प्रश्न विचारताच भडकले शरद पवार
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांना देश चालवायचा आहे, मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याने वातावरण तापलं आहे. मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यावर संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का, असा उलट सवाल शरद पवार यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केला. त्याचबरोबर ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडल्याचीचर्चा आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवारांनीही यावरून सरकारलाकानपिचक्या दिल्या आहेत.एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. राज्यात आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला आहे. मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांना देश चालवायचा आहे, मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे, मराठे सिंह आहेत, त्यांनी आपलं जंगल राखावं,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा जीवन गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात दररोज नवनवीन समस्यांची पालवी फुटत असते. त्यावर रामबाण उपाय करण्याचे काम शासनपार पाडत आहे. चांगले पार पाडत आहेत, असे संभाजी भिडेम्हणाले होते.असंवक्तव्य संभाजीभिडे यांनीकेलं होतं.त्यावरबोलतानाशरदपवारांनीहीप्रतिक्रियादिली.
पत्रकारांनी संभाजी भिडेंच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेबाबत शरद पवारांना सवाल केल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. माध्यम प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. मात्र प्रश्न पूर्ण होण्याच्या आताच पवारांनी नाराजी व्यक्त करत संभाजी भिडे वगैरे कॉमेंट्स करायच्या लायकीची माणसे आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? त्यामुळेच मी तुम्हाला भेटायचे नाही म्हणत होतो. काहीही विचारता, एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक, असे म्हणत शरद पवार यांनी पत्रकार परिषद संपवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here