Home जालना मनोज जरांगेंनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मनोज जरांगेंनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

29
0

आशाताई बच्छाव

1000652547.jpg

मनोज जरांगेंनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जालना : मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथे नीट आणि एमएचटी-सीईटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी सत्कार समारंभासाठी आलेल्या विद्यार्थिनींनी मनोज जरांगे यांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरे केले. या वेळी विशेष म्हणजे मुस्लिम विद्यार्थिनींनी सुद्धा जरांगे पाटील यांना राखी बांधत रक्षा बंधन साजरा केला.
यावेळी जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.या वेळी जरांगे पाटील यांनी विद्यालंकार कोचिंग क्लासेसच्या संचालक यांनी १०० मुलांना मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम राबवला आहे. त्याचे कौतुक करत महाराष्ट्रातील संस्था चालकांनी ही गोरगरीब विद्यार्थ्यांना राज्यातील सर्व संस्थाचालकांनी याप्रमाणे मोफत शिक्षण द्यावे, अशी विनंती केली आहे. गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसल्याने त्यांना इच्छा असताना सुद्धा आज डॉक्टर, इंजिनिअर होता येत नाही. अशा उपक्रमाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना एका प्रकारे आधार मिळेल. या संस्थेने जातपात न मानता सर्वांसाठी गरीब विद्यार्थ्यांना आधार दिला. तसाच आधार राज्यातील संस्थांनी द्यावा, अशी विनंतीही जरांगे पाटील यांनी राज्यातील संस्थांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here