Home जालना कोलकत्ता येथील दुर्देवी प्रकरणाचा बदनापूर डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने तीव्र निषेध : काळी...

कोलकत्ता येथील दुर्देवी प्रकरणाचा बदनापूर डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने तीव्र निषेध : काळी फित बांधून रुग्णसेवा

24
0

आशाताई बच्छाव

1000652524.jpg

कोलकत्ता येथील दुर्देवी प्रकरणाचा बदनापूर डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने
तीव्र निषेध : काळी फित बांधून रुग्णसेवा
बदनापूर जालना, दि. १७(दिलीप बोंडे प्रतिनिधी)- बदनापूर येथील डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने
आज सर्व डॉक्टरांनी कोलकत्ता येथील दुर्र्देवी प्रकरणाच्या निषेधार्थ
काळी फित बांधून रुग्णसेवा करुन त्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त
करीत आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी डॉक्टरांंच्या वतीने करण्यात
आली.
कोलकत्ता येथे ९ ऑगस्ट रोजी आर.जी. मेडीकल कॉलेज येथील एका तरुण
पदव्युत्तर चेस्ट मेडिसीनच्या विद्यार्थिनीवर सेवा बजावत असतांना
क्रुरपणे बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. सदरील घटनेने वैद्यकीय
समुदाय व देशाला धक्का बसला आहे. ही घटना डॉक्टर्स विशेषतः महिलांच्या
हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांसाठी सुरक्षेच्या
आवश्यकतेचा संकेत देत आहे. यात पिडीतेच्या समर्थ्थनात आज सकाळपासून
बदनापूर डॉक्टर्स असोशिएशन सर्व डॉक्टरांनी काळी फित बांधून रुग्णसेवा
केली. डॉक्टर्स असोशिएशनचे डॉ. अरुण खैरे, डॉ. किरण जर्‍हाड, डॉ. कासट,
डॉ. दरक, डॉ. अर्जुन शेळके, डॉ. खांडेभराड, डॉ. गौरव तातेड, डॉ. राजु
पवार, डॉ. प्रदीप कदम, डॉ. कृष्णा सरोदे, डॉ. मनोज वाळके, डॉ. शिवा
गायकवाड, डॉ. अविनाश गाभणे, डॉ. संतोष वाघ, डॉ. कुंडकर, डॉ. सुहास भागवत,
डॉ. वैâलास भारती, डॉ. आव्हाड, डॉ. बदनापूरकर, डॉ. धांडे, डॉ. शिवा
गायकवाड, डॉ. राम पाटील, डॉ. प्रविण पवार, डॉ. सचिन उकर्डे, डॉ. राजपुत,
डॉ. पंकज बोरुडे, डॉ. किशोर देशमुख, डॉ. गिराम, डॉ. वैâलास बनकर, डॉ.
राहुल जैस्वाल, डॉ. जायभाये, डॉ. बाबासाहेब घनघाव आदी डॉक्टरांचा समावेश
आहे.

Previous articleअखेर शिलोडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले निवेदन.
Next articleवर्धापन दिनानिमित्त ऍम्ब्युलन्स ड्रायव्हरचा सत्कार सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here