Home बुलढाणा मेहकर मध्ये चालविले जात होते अवैध सोनोग्राफी सेंटर, पोलीस अधीक्षक यांनी छापा...

मेहकर मध्ये चालविले जात होते अवैध सोनोग्राफी सेंटर, पोलीस अधीक्षक यांनी छापा मारुन केली दोघांना अटक.

38
0

आशाताई बच्छाव

1000619696.jpg

मेहकर मध्ये चालविले जात होते अवैध सोनोग्राफी सेंटर, पोलीस अधीक्षक यांनी छापा मारुन केली दोघांना अटक.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सुरू असलेल्या एका अवैध सोनाग्राफी सेंटरवर आरोग्य, पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत 5 ऑगस्ट रोजी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध सोनोग्राफी सेंटरचा गोरखधंदा समोर आला असून याचे धागेदोरे आता कुठपर्यंत पोहोचतात या बाबी तपासात उघड होतील. सविस्तर वृत्त असे की मेहकर शहरातील पवनसुत नगरमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
मेहकर येथे एका भाड्याच्या जागेमध्ये हे अवैध सोनोग्राफी सेंटर सुरू होते. शनिवारी दुपारपासून ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी किसन हरिभाऊ गरड (रा. करंजी, ता. रिसोड, जि. वाशीम) व गणेश शिवाजी सुलताने (गुंजखेड, ता लोणार, जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेतले.

Previous articleबिलाच्या कारणावरून हॉटेलमालकाची ग्राहकास मारहाण, नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील घटना : विविध कलमान्वये केला गुन्हा दाखल
Next articleमाटरगावात रस्त्यांवर पाणी ! ग्रामस्थ हैराण, ग्रामपंचायत दुर्लक्षित !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here