Home नांदेड देगलूर महाविद्यालयात करियरकट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

देगलूर महाविद्यालयात करियरकट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

39
0

आशाताई बच्छाव

1000619555.jpg

देगलूर महाविद्यालयात करियरकट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

देगलूर:येथील अ व्या शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भावी करियर विषयी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ प्रा. महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ होते.
प्रारंभी करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमातून आम्ही नेहमीच संधी उपलब्ध करून देत असतो ही संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला मिळाली तर आज ज्या काही ऑलोंम्पिकच्या विविध स्पर्धा होत आहेत.तिथपर्यंत हा ग्रामीण भागातील विद्यार्थी पोहचू शकतो असे विचार मांडले. तसेच आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी ही जाऊ शकतो. यासाठी संधी उपलब्ध करून देणे हे आमच्या महाविद्यालयाचे काम आहे. असे मनोगत व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संविधान तक्ता (Blueprint)म्हणजे काय प्रकरणानुसार गुण विभागणी तसेच प्रश्नानुसार गुण विभागणी यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर करिअरच्या विविध संध्या या संदर्भात ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश दरक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी महाविद्यालयात पाठवलेले आहे. पण अनेक विद्यार्थी यातून प्रयत्न करून सुद्धा डॉक्टर होत नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनात नीट ची परीक्षा रिपीट न करता डॉक्टर साठी लागणारे विविध सहाय्यक पद साठी आपल्या जीवनात अनेक कोर्स उपलब्ध आहेत त्या कोर्सला आपण प्रवेश घेऊन एमआर तज्ञ एक्स-रे तज्ञ रक्त तपासणी तज्ञ आणि सोनोग्राफी, फिजिओथेरपी तज्ञ म्हणजेच डॉक्टर टेक्निशियन तज्ञ बनले पाहिजे जेणे करून की डॉक्टर या सर्व तज्ञ शिवाय कोणताही इलाज आणि ऑपरेशन करूच शकत नाही. म्हणून यासारख्या क्षेत्रामध्ये जाऊन प्रत्यक्ष डॉक्टर नाही बनता आलं तरी डॉक्टरांचे सहाय्यक बनून आपण आपल्या जीवनात करियर करू शकतो असे महत्त्वाचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना केले आहे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील यांनी केले तर आभार डॉ. धनराज लझडे यांनी मानले .यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार , डॉ .संजय देबडे , डॉ. व्यंकटेश शेरीकर, प्रा. महेश कुलकर्णी प्रा. मल्लूरवार, प्रा. हाके , प्रा. नागरगोजे प्रा सावळे प्रा हाके सीताराम यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleआपापसातील मतभेद बाजूला ठेवा आ.गडाखांचे कार्यकर्त्यांना आवाहन । मुकिंदपूरला घोंगडी बैठक
Next articleप्रधानमंत्री आवास योजनेची न भेटलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा – डॉ. मिलिंद नरोटे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here