Home अमरावती विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट पडले, ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी...

विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट पडले, ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी १०० आमदार हवेत. प्रकाश आंबेडकर.

40
0

आशाताई बच्छाव

1000614461.jpg

विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट पडले, ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी १०० आमदार हवेत. प्रकाश आंबेडकर.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले आहेत. हे राजकीय भांडण निवडणुकीपर्यंत चालेल, असे मी यापूर्वी म्हणालो होतो. ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि मराठी ओबीसींना मतदान करणार नाहीत. आपल्या आरक्षण जाते ही जाणीव ओबीसींना झाली आहे. जर ओबीसी आरक्षण टिकवायचे असेल तर विधानसभेत शंभर ओबीसी आमदार पाठविण्याची तयारी आम्ही करीत असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऑड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती आज सोमवारी व्यक्त केले. तसेच दोन तट असली तरी हे आपले राजकीय भांडण असल्याचे भूमिका आंबेडकर यांनी सांगितले
ओबीसी जागर यात्रेच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे अमरावतीमध्ये आहेत . यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आंबेडकर म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांना कणा नाही, त्यांना कणा असता, तर ते झुकले नसते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची तुलना केली, तर एकनाथ शिंदे यांची कामगिरी सरस आहे. गॅस सरळ सरळ अर्थ असा आहे, की जी शिवसेनेची मते आहेत, ती एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील आणि शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खरी शिवसेना मानत आहे. तर सध्या राज्यात जे मराठा, ओबीसी असे दोन तट पडले आहेत याला मनोज जरंगें जी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे, त्यामुळे दोन तट पडले आहेत. राजकीय भांडणाचे सामाजिक भांडणात रूपांतर करण्याचे अनेकांचे मनसुबे ओबीसी आरक्षणाच्या यात्रेतून उध्वस्त झाले असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसीत की जातनिहाय जनगणना मान्य करून घेईल. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल. असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणणार असे आव्हान त्यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात वाढत असलेल्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. लोकसंख्येवर वंचित यांचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांना सरकारने मागेपुढे न बघता आत मध्ये टाकले पाहिजे असे म्हणत खळबळ उडून दिली आहे. महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यात राहतो गुजरात मध्ये ही राहतो त्याचे काय करायचे त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभागण्याचा वक्ते व आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यु ए पी ए राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई असेही ऑड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Previous articleमानवाधिकार आयोगाच्या नावाने १५ लाखांनी गंडवले; तोतया पदाधिकाऱ्यांना अटक.
Next articleदेवळा येथील युवा संवाद मेळाव्यात युवकांकडून केदा आहेर यांच्या उमेदवारीची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here