Home बुलढाणा गांगलगाव येथील टॅक्टर व मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या चार तासात पकडले!...

गांगलगाव येथील टॅक्टर व मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या चार तासात पकडले! आरोपींकडून टॕक्टर व मोटारसायकल जप्त

27
0

आशाताई बच्छाव

1000614434.jpg

गांगलगाव येथील टॅक्टर व मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या चार तासात पकडले! आरोपींकडून टॕक्टर व मोटारसायकल जप्त
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
अंढेरा/ चिखली :– पोलिसांनी संयुक्त कामगिरी. दे राजा एकनाथ माळेकर स्थानिक अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे गांगलगाव येथुन भरदिवसा एक टॅक्टर व एक मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना दि.४आॕगस्ट २०२४ रोजी घडल्याने नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते.गजानन हरिभाऊ म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.घटनेची माहिती मिळताच अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ तपासाची सुञे हाती घेत मोठ्या चालाखीने अवघ्या बारा तासांच्या आत तीनही आरोपींना टॅक्टर व मोटारसायकल सह पकडण्यात अंढेरा पोलिसांन यश आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,गांगलगाल येथील रहिवासी असलेले गजानन हरिभाऊ म्हस्के यांनी स्वताहाची शेतात काम करण्यासाठी स्वराज कंपनीचे स्वराज ७४२ एक्स टी लाल रंगाचे टॅक्टर सचिन शो रूम चिखली येथुन घेतले होते.टॕक्टर एम.एच २८ बी.डब्लिव्ह.१५१० क्रमांकाचे टॅक्टर मधुकर रामकृष्ण म्हस्के यांच्या घरासमोर उभे राहत असे.दि.४आॕगस्ट २०२४ रोजी घरासमोर टॅक्टर उभा नसल्याने मधुकर रामकृष्ण म्हस्के यांनी गजानन हरिभाऊ म्हस्के यांना फोन करून सांगितले असता शोधाशोध घेतला परंतु टॕक्टर सापडले नाही.तसेच गावातील अनिल नागोराव आराख यांची मालकीची हिरो पॕशन प्रो मोटारसायकल क्रमांक एम‌एच २८ बीयु ८०९४ घरासमोरुन अज्ञात चोरट्या‌ंनी लंपास केल्याची घटना ४आॕगस्ट २०२४रोजी उघडकीस आली.
नमुद गुन्हा दाखल होताच ठाणेदार विकास पाटील यांना गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली की, सदर ट्रॅक्टर चोरीतील आरोपी हे मोटार सायकल क्रमांक MH २८ AR ४५१९ ने वरुड कडून ग्राम देऊळगाव घुबे कडे येणार आहे वरुन त्यांनी पोलीस स्टॉफसह ग्राम देऊळगाव घुबे येथे खाजगी वाहनाने रवाना होवुन मिळालेल्या माहितीप्रमाणे कोनड खु त्रिफुली येथे सापळा रचुन गोपनीय माहितीत मिळालेल्या माहितीच्या वर्णनाची मोटार सायकल वरील ईसमांना पकडले वरुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १. शिवाजी दिनकर काळे वय ३२ वर्ष रा गांगलगाव ता. चिखली जि. बुलडाणा २. वैभव विठ्ठल म्हस्के वय
२४ वर्ष रा गांगलगाव ता. चिखली जि. बुलडाणा ३. अमोल विष्णु गळकर वय ३० वर्ष रा गांगलगाव ता. चिखली जि. बुलडाणा असे सांगितले वरुन त्यांना विश्वासात घेवून सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले वरुन आरोपी यांनी गुन्हा करताना वापरलेली त्यांची मोटार सायकल क्रमांक MH २८ AR ४५१९ जप्ती प्ही जप्त करण्यात आली तसेच आरोपी यांना त्यांनी चोरलेल्या ट्रॅक्टर व मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही सदरचे ट्रॅक्टर व मोटार सायकल चोरुन ती देळेगव्हाण शिवारातील सैजामाता ते देळगव्हाण जाणारे गडाचे रस्त्याने लावून ठेवल्याचे सांगितले वरुन पोलीस स्टेशन, टेंभुर्णी ता जाफ्राबाद जि जालना येथे संपर्क केला असता त्यांनी एक ट्रॅक्टर व मोटार सायकल बेवारस स्थितीत मिळुन आल्याचे कळविल्याने मा. वरिष्ठांचे आदेशाने सदरची वाहने तपासकामी जप्त करण्यात आले आहे गुन्हयाचा पुढील तपास सफौ गणेश देढे करित आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देउळगाव राजा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विकास पाटील ठाणेदार अंढेरा, पोउपनि श्री सुरेश जारवाल,गोरख राठोड,भरत पोफळे,भागवत गिरी तसेच पोलीस ठाणे चिखली डिबी पथकाचे पोउपनि नितिनसिंग चौव्हाण,अमोल गवई,प्रशांत धंदर,पंढरीनाथ मिसाळ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here