Home नांदेड मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 6 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन.

मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 6 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन.

44
0

आशाताई बच्छाव

1000604719.jpg

मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 6 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड, दि. 2 ऑगस्ट :- सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत सन 2024-25 मध्ये चालू खरीप हंगामामध्ये निविष्ठा 100 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील 10 दिवसापासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या कमी प्रमाणात असल्याने 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in – farmer login या वेबसाईटवर 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

अर्ज करणेची पध्दत mahadbt.maharashtra.gov.in – farmer login लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकावा, अर्ज करा बाबीवर क्लिक करणे, कृषि यांत्रिकीकरण, बावी निवडा यावर क्लिक करणे, मुख्य घटक बाबीवर क्लिक करणे, कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, तपशिल बाबीवर क्लिक करून, मनुष्यचलीत औजारे घटक निवडणे, यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून, पिक संरक्षण औजारे निवडणे, मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बॅटरीसंचलीत फवारणी पंप (गळीतधान्य) निवडणे जतन करा याप्रमाणे आहे.

Previous articleशेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी नोंदणी करण्याचे आवाहन.
Next articleवसाका विक्री न करता भाडे करारावर द्यावा; आ. आहेरांसह शिष्टमंडळाची अजित पवारांकडे मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here