Home बुलढाणा आपण सारे भाऊ, पोट फुटेपर्यंत खाऊ.!’ – जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाऱ्यांवर दोष...

आपण सारे भाऊ, पोट फुटेपर्यंत खाऊ.!’ – जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाऱ्यांवर दोष सिद्ध होऊनही कारवाईस चालढकल ! -केंद्रीय आयुष मंत्री जाधव यांनी लक्ष वेधण्याची मागणी

34
0

आशाताई बच्छाव

1000602149.jpg

‘आपण सारे भाऊ, पोट फुटेपर्यंत खाऊ.!’ – जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाऱ्यांवर दोष सिद्ध होऊनही कारवाईस चालढकल ! -केंद्रीय आयुष मंत्री जाधव यांनी लक्ष वेधण्याची मागणी
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. प्रशासकीय अब्रू चव्हाट्यावर आणणाऱ्यांवर दोष सिद्ध होऊन सुद्धा कारवाईस चालढकल का होत आहे? केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप का करत नाही? असा सवाल जनता विचारत आहे. त्यांनी या भ्रष्टाचार प्रकरणी लक्ष वेधावे, अशी मागणी जोर धरत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. कनिष्ठ – वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘आपण
सारे भाऊ पोट फुटेपर्यंत खाऊ.’ असा कित्ता गिरवला. राजकीय वरदहस्त लाभलेल्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित व डॉ. नितीन कडस यांच्यासह बहुचर्चित निलंबित भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांच्या कार्यकाळात करोडो रुपये साहित्य व उपकरणे खरेदी कागदोपत्रीच दाखवली आहे. याप्रकरणी झालेल्या प्रत्येक तक्रारींवर आलेल्या विविध चौकशी समितीने दिलेल्या अहवालात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र उपसंचालक कार्यालय अकोला यांना प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही अधिकारी व कर्मचारी नियमबाह्य कित्येक वर्षांपासून (डेपोटेशनवर) कार्यरत आहे. त्या माननीय
श्रीमान अधिकारी व कर्मचाऱ्यांची शिक्षण पात्रताची पडताळणी करून त्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींवर कारवाई होणे गरजेचे असून अति महत्वाचे भांडार विभागातील त्या खासगी कर्मचाऱ्याची मदतनीस म्हणून केलेली नियुक्ती ही नियमबाह्य असल्याची तक्रारीची आरोग्य प्रशासनाने त्वरीत दखल घ्यावी अन्यथा तक्रारकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत. दरम्यान जनसंचलन, युवा मराठा न्यूज बुलढाणा या भ्रष्टाचार प्रकरणी लढाई लढत असून, आयुष मंत्री प्रतापराव जाधव त्यांच्या जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या भ्रष्टाचार प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय का मिळवून देत नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here